बामणी येथील सरल फाऊंडेशनचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:18 IST2021-07-23T04:18:01+5:302021-07-23T04:18:01+5:30
बामणी : मागील दोन वर्षांपासून कोरोना या महामारीने जगभरात हाहाकार माजवलेला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत लॉकडाऊनच्या दरम्यान बामणी परिसरातील ...

बामणी येथील सरल फाऊंडेशनचा सत्कार
बामणी : मागील दोन वर्षांपासून कोरोना या महामारीने जगभरात हाहाकार माजवलेला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत लॉकडाऊनच्या दरम्यान बामणी परिसरातील केमरिठ, अमितनगर येथील गरीब व गरजू लोकांना सरल फाऊंडेशनच्या टीमने घरोघरी जाऊन किराणा किटचे वाटप केले. रक्तदान शिबिर घेतले, मास्कचे वाटप केले. सरल फाऊंडेशच्या या सेवाभावी कार्याची दखल घेत माजी अर्थमंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सरल फाऊंडेशन टीमला गौरविण्यात आले.
रक्तदान शिबिरात सरल फाऊंडेशनच्या आठ सदस्यांसह गावातील २४ युवकांनी रक्तदान केले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बामणी या गावात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती, प्रशासनही हतबल झाले, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यूचे प्रमाणही वाढायला लागले. बामणी गावातील रुग्णांसाठी लोकसहभागातून ऑक्सिजन काँन्सेन्ट्रेटर घेण्याचे फाऊंडेशनने ठरविले. यासाठी बऱ्याचशा लोकांनी देणगी स्वरूपात आर्थिक सहकार्य केले. ऑक्सिजनची गरज भासल्यास सरल फाऊंडेशनचे सभासद रुग्णांच्या घरी जाऊन मशीन लावून देत होते, हे विशेष.
220721\img-20210721-wa0005.jpg
बामणी येथील सरल फांऊडेशन चा सत्कार