१ हजार ५१ दीप लावून शहिदांना श्रद्धांजली
By Admin | Updated: November 4, 2016 01:25 IST2016-11-04T01:25:57+5:302016-11-04T01:25:57+5:30
येथील समाधी वार्डातील श्री काळाराम मंदिर देवस्थानद्वारे 'एक दिया शाहिदों के नाम' हा कार्यक्रम घेऊन बुधवारी शहिदांना

१ हजार ५१ दीप लावून शहिदांना श्रद्धांजली
'एक दिया शहिदों के नाम' कार्यक्रमाचे आयोजन
चंद्रपूर : येथील समाधी वार्डातील श्री काळाराम मंदिर देवस्थानद्वारे 'एक दिया शाहिदों के नाम' हा कार्यक्रम घेऊन बुधवारी शहिदांना एक हजार ५१ दिवे लावून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यंदाही प्र. बा. डोमलवार यांचा प्रमुख उपस्थितीत महादीपोत्सव कार्यक्रम झाला. यावेळी समाजातील अनिष्ट प्रथा, चालीरीती यांना मूठमाती देऊन प्रकाश पर्वाकडे जाण्याचा सल्ला डोमलवार यांनी दिला. प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीनी कमीत कमी पाच दिव्यांचा पणती श्रीराम मंदिर येथे लावल्या. त्यामुळे दिव्यांची जणू आरसाच विलोभनीय वाटत होती. या दीपोत्सवामुळे परिसरात सर्वत्र हर्षोउल्लासाचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्तिक दीपोत्सवनिमित्य समाजातील महिला व पुरुषानी एकत्र येऊन भारतीय शाहिद जवानांना श्रद्धांजली वाहिली. मानवी मनात नवा आदर्श निर्माण करण्याचे आवाहन आयोजकांनी केले.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता काळाराम सेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम केले. (प्रतिनिधी)