जया द्वादशीवार यांना उद्या श्रद्धांजली

By Admin | Updated: April 19, 2017 00:43 IST2017-04-19T00:43:30+5:302017-04-19T00:43:30+5:30

प्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत व प्राध्यापक जया द्वादशीवार यांच्या निधनाला एक महिना पूर्ण होत आहे.

Tribute to Jaya Dashashivard tomorrow | जया द्वादशीवार यांना उद्या श्रद्धांजली

जया द्वादशीवार यांना उद्या श्रद्धांजली

नागपूर : प्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत व प्राध्यापक जया द्वादशीवार यांच्या निधनाला एक महिना पूर्ण होत आहे. त्या निमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एका सभेचे गुरुवार २० एप्रिल रोजी संध्याकाळी ५.३० वाजता नागपुरातील श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृह, राष्ट्रभाषा संकुल येथे आयोजन करण्यात आले आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे आयोजित या श्रद्धांजली सभेत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकांत तिडके, आदिवासी भागात कार्यरत डॉ. कन्ना मडावी, ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे आणि सविता भट आपल्या संवेदना व्यक्त करतील. या श्रद्धांजली सभेच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री शोभाताई फडणवीस या राहतील. या सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Tribute to Jaya Dashashivard tomorrow