वृक्ष लागवडीसाठी जनजागरण मोहीम

By Admin | Updated: June 23, 2016 00:38 IST2016-06-23T00:38:05+5:302016-06-23T00:38:05+5:30

दोन कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट संपुर्ण महाराष्ट्रात पुर्ण करायचे असून आम्ही वृक्षांसाठी, वृक्ष सर्वांसाठी, या घोषवाक्याचा आधार घेत...

Treasury campaign for tree plantation | वृक्ष लागवडीसाठी जनजागरण मोहीम

वृक्ष लागवडीसाठी जनजागरण मोहीम

गेवरा : दोन कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट संपुर्ण महाराष्ट्रात पुर्ण करायचे असून आम्ही वृक्षांसाठी, वृक्ष सर्वांसाठी, या घोषवाक्याचा आधार घेत चंद्रपूर जिल्ह्यातील सावली वनपरिक्षेत्रांतर्गत १ लाख ९८ हजार वृक्ष लागवडीकरिता एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी जनजागृतीही केली जात आहे.
परिक्षेत्रातील ५४ ग्रामपंचायतीतील ५९ गावातून जनजागरण सुरु केले असून शाळा, महाविद्यालये, औद्योगिक महामंडळ, सामाजिक वनीकरण, वनविकास महामंडळ, पोलीस विभाग, महसूल, नगरपंचायत, परिक्षेत्र पाथरी, पालेबारसा, सामाजिक संस्थाच्या समन्वयातून वृक्ष लागवडीकरिता विशेष उपक्रम हाती घेतला आहे. ग्रामसभा, बॅनर, पोस्टर, याशिवाय परिक्षेत्रातातील राजोली, सावली, पेंढरी, पाथरी, व्याहाड, उपक्षेत्रातील मुख्य गावांमधून मोटरसायकल रँलीचे आयोजनही करण्यात आले. त्यामध्ये सर्व वनकर्मचारी, ग्रामस्थ सहभागी झाले होते. राज्य शासनाच्या दोन कोटी वृक्ष लागवडीच्या उपक्रमात हा स्वयंस्फूर्तीने विशेष उपक्रम चंद्रपूरचे मुख्यवनसंरक्षक संजय ठाकरे, उपवनसंरक्षक आर. टी धाबेकर यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्राधिकारी एम.पी. राठोड यांनी सुरु केला आहे. याकरिता सावली तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थांनी झाडे लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

Web Title: Treasury campaign for tree plantation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.