स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही चिखलातूनच प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:10 AM2021-08-02T04:10:19+5:302021-08-02T04:10:19+5:30

पांदण रस्त्याची व्यथा; शेतकरी शेतमजूर यांची अडचण कोरपना : तालुक्यातील जेवरा ते तुळसी हा पांदण रस्ता, गेल्या अनेक दशकांपासून ...

Travel through the mud even after the seventies of independence | स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही चिखलातूनच प्रवास

स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही चिखलातूनच प्रवास

Next

पांदण रस्त्याची व्यथा; शेतकरी शेतमजूर यांची अडचण

कोरपना : तालुक्यातील जेवरा ते तुळसी हा पांदण रस्ता, गेल्या अनेक दशकांपासून दगडधोंड्याचाच असल्याने शेतकरी, शेतमजूर व ग्रामस्थांना चिखलातूनच वाट तुडवत प्रवास करावा लागत आहे.

या रस्त्याचे साधे खडीकरण झाले नाही. परिणामी, पावसाळ्यात जाण्या-येण्यात मोठी अडचण निर्माण होत आहे. हा मार्ग सुस्थितीत नसल्याने दोन ते तीन किलोमीटर असलेल्या जेवरा ते तुळशी गावादरम्यान प्रवास करण्यासाठी ११ किलोमीटर अधिकचे अंतर मोजावे लागत आहे. यात वेळ व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याचे किमान खडीकरण तरी होणे अत्यंत गरजेचे आहे. यावर लोकप्रतिनिधी व बांधकाम विभाग यांनी लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. हा मार्ग झाल्यास नागरिकांची होणारी गैरसोय दूर होईल.

कोट

जेवरा ते तुळशी हा रस्ता अतिशय खडतर आहे. त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांना शेतात जाण्या- येण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. या अनुषंगाने रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी अपेक्षा आहे.

- राजू दरणे, शेतकरी

Web Title: Travel through the mud even after the seventies of independence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app