४३८ विद्यार्थ्यांच्या आईच्या खात्यात जमा होणार प्रवास निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:28 IST2021-04-01T04:28:55+5:302021-04-01T04:28:55+5:30
चंद्रपूर : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम अंतर्गत जवळ शाळा नसलेल्या विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता म्हणून ...

४३८ विद्यार्थ्यांच्या आईच्या खात्यात जमा होणार प्रवास निधी
चंद्रपूर : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम अंतर्गत जवळ शाळा नसलेल्या विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता म्हणून प्रत्येकी ३०० रुपये प्रतिमाह देण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ४३८ विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार असून त्यांच्या आईच्या खात्यामध्ये सदर निधी जमा करण्यात येणार आहे.
यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान, शासनाने २७ जानेवारीपासून ५ व्या वर्गापासून शाळा सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेतला. त्यानंतर शाळा सुरु झाल्या. दरम्यान, ६ ते १४ वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत देण्यात येते. यासाठी विद्यार्थ्यांच्या घराजवळ शाळा नसेल तर त्यांना शासनाकडून अधिकृत खासगी वाहनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात निर्णय घेतला आहे. या अंतर्गत राज्यामध्ये १६ हजार ३३४ विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. दम्यान, चंद्रपूर जिल्ह्याचा विचार केल्यास जिल्ह्यामध्ये ४३८ विद्यार्थ्यांना हा लाभ मिळणार असून फेब्रुवारी तसेच मार्च या दोन महिन्याचे प्रत्येकी ३०० प्रमाणे ६०० रुपये विद्यार्थ्यांच्या आईच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांची शाळेतील एकूण ५० टक्के हजेरी ग्राह्य धरण्यात येणार आहे.
लाभार्थी विद्यार्थी संख्या
४३८
एकूण रक्कम
२६,२८००