केंद्रप्रमुखांना प्रवासभत्ता नवीन दराने देऊ

By Admin | Updated: February 3, 2015 22:53 IST2015-02-03T22:53:12+5:302015-02-03T22:53:12+5:30

शिक्षणाचे पवित्र कार्य करताना विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता शिक्षकांनी घेतली पाहिजे. केंद्रप्रमुखाच्या मागण्या रास्त असून त्या त्वरित निकाली काढण्यात येईल,

Travel at the center of the journey to the center | केंद्रप्रमुखांना प्रवासभत्ता नवीन दराने देऊ

केंद्रप्रमुखांना प्रवासभत्ता नवीन दराने देऊ

चंद्रपूर : शिक्षणाचे पवित्र कार्य करताना विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता शिक्षकांनी घेतली पाहिजे. केंद्रप्रमुखाच्या मागण्या रास्त असून त्या त्वरित निकाली काढण्यात येईल, केंद्र प्रमुखांचा प्रवास भत्ता नवीन दराने लागू केला जाईल, असे आश्वासन वित्तमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
महाराष्ट्र प्रदेश जिल्हा परिषद केंद्रप्रमुख संघ जिल्हा शाखा चंद्रपूरच्यावतीने विभागीय शैक्षणिक कार्यशाळा व अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
या संमेलनाच्या प्रथम सत्रात ‘शैक्षणिक गुणवत्ता विकासात केंद्र प्रमुखाची भूमिका’ या विषयावर अर्जुन साळवे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी प्राचार्य शरदचंद्र पाटील, गौतम मेश्राम, रामराव जगदाळे, जयवंतराव दुबे यांनी आपले विचार व्यक्त केले. केंद्र प्रमुख शिक्षण प्रक्रियेतील कणा आहे. गुणवत्ता वाढीस केंद्रप्रमुखांवर सोपविलेली जबाबदारी पूर्ण केल्यास नक्कीच गुणवत्तवा वाढेल असे मत व्यक्त करण्यात आले. यावेळी विविध विषयांवरही चर्चा करण्यात आली. केंद्र प्रमुखांनी आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडली तर शिक्षणाचा दर्जा वाढतील, असेही उपस्थितांनी मत व्यक्त केले. यावेळी विशेष अतिथी म्हणून जिल्हा परिषद शिक्षण सभापती देवराव भोंगळे होते. त्यांनी केंद्रप्रमुखांना दोनशे ऐवजी सहाव्या वेतन आयोगातील तरतुदीप्रमाणे एक हजार ६५० रुपये भत्ता व कर्तव्य जबाबदारीत वाढ झाल्यामुळे वेतनवाढ व इतरही मागण्या रास्त असून शासनस्तरावर पाठपुरावा करून सोडविण्यास मदत करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा केंद्रप्रमुख संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याचसोबत केंद्रप्रमुख रामराव हरडे, जयवंतराव दुबे, गौतम मेश्राम, नामदेवराव झाडे, सीमा फेंडर, कल्पना दुरुगकर, जयवंत उपाध्ये, ई.एन. येळणे, अशोक आळे आदी पदाधिकाऱ्यांचाही राज्याध्यक्ष अर्जूनराव साळवे यांच्या हस्ते करण्यात सत्कार करण्यात आला. संमेलनाला नागपूर विभागातील चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील केंद्रप्रमुख उपस्थित होते. केंद्राची पुर्नरचना करून केंद्रप्रमुखांची पदे भरणे, केंद्रप्रमुखातूनच शिक्षण विस्तार अधिकारी पद भरावे,केंद्रप्रमुख प्रवासभत्ता, ग्रेड पे, वेतनवाढ देण्यात यावी आदी मागदण्यांचे एक निवेदनही मुनगंटीवार यांना देण्यात आले. संचालन सबतकौर भौंड व राजेंद्र पाटील, प्रास्ताविक रामराव हरडे तर आभार मारोतराव रायपूरे यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Travel at the center of the journey to the center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.