शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
2
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
4
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
5
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
6
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
7
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
8
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
9
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
10
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
11
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
12
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
13
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
14
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
15
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
16
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
17
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
18
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
19
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
20
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

ताडपत्री न झाकताच बांधकाम साहित्याची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 22:34 IST

शहरात मोठ्या प्रमाणात बांधकाम साहित्याची ट्रकद्वारे वाहतूक केली जात आहे. मात्र ताडपत्री न लावताच वाहतूक करण्यात येत असल्याना अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. सध्या शाळा, महाविद्यालये सुरु झाले आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : अपघात झाल्यास जबाबदार कोण?

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरात मोठ्या प्रमाणात बांधकाम साहित्याची ट्रकद्वारे वाहतूक केली जात आहे. मात्र ताडपत्री न लावताच वाहतूक करण्यात येत असल्याना अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. सध्या शाळा, महाविद्यालये सुरु झाले आहे. सकाळी आणि सायंकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची रस्त्यावर गर्दी असते. अनेकवेळा वाहनातून बांधकाम साहित्य रस्त्यावर पडतात. याकडे संबंधित विभागाने विशेष लक्ष देवून ताडपत्री न लावता बांधकाम साहित्याची वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाही करावी, अशी मागणी केली जात आहे.शासनाच्या महसूल व वनविभागाने काही वर्षांपूर्वीच परिपत्रक काढून गौण तसेच इतर साहित्याची वाहतूक करताना ट्रक व ट्रॅक्टरची उंची वाढवून ताडपत्री झाकण्याचे आदेश दिले आहे. मात्र याकडे वाहनधारक तसेच वाहक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात सर्वत्र आहेत.अनेकवेळा क्षमतेपेक्षा जास्त साहित्य नेण्याचा प्रकारही येथे सुरु आहे. त्यामुळे रस्त्यावर ट्रक व इतर वाहनांच्या अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. अनेकवेळा वाहनातील साहित्य रस्त्यावर पडत असल्याने अन्य वाहन चालकांना देखील त्रास सहन करावा लागत आहे. धावत्या वाहनामुळे मागे असणाºया वाहनधारकांच्या डोळ्यात रेती तसेच धुळ जाऊन धोका निर्माण होऊ शकतो. रस्त्यांची क्षमता नसतानाही अनेकवेळा जडवाहतूक केली जात असून वाहन चालक वाहतूक परवाना न बाळगता गौण खनिजाची वाहतूक करतात.चंद्रपूर-नागपूर, मूल, बल्लारपूर, गोंडपिपरी, जिवती-कोरपना मार्गावर मोठ्या प्रमाणात जडवाहतूक तसेच ताडपत्री न झाकता वाहतूक केली जात आहे. याकडे वाहतूक तसेच प्रादेशित परिवहन विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.पालकांनो सावधानसध्या शाळा-महाविद्यालय सुरु झाले आहे. अनेक पालक आपल्या पाल्यांना शाळेत ने-आण करण्यासाठी आॅटो तसेच इतर वाहनाचा आधार घेत आहे. मात्र आपले पाल्य किती सुरक्षित आहे, हे पालकांनी तपासणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या अनेक आॅटोंना जाळी बसवलेली नसल्याने एखाद्यावेळी अपघात होण्याची शक्यता आहे. आॅटोेचालकाने क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आॅटोत बसविले काय, हे बघणे गरजेचे आहे. तसेच आॅटोचालकाला काही व्यसन आहे का, असेल तर आपल्या पाल्याला त्या आॅटोमध्ये न पाठविता दुसºयाची निवड करावी तसेच शाळा प्रशासनालाही आॅटोचालकाची संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे.रस्त्याच्या क्षमतेपेक्षा जड वाहतूकरस्त्याच्या क्षमतेपेक्षा जड वाहतूक केल्याने रस्त्यावर खड्डे पडतात. तसेच किनाऱ्यावर व वळणावर रस्ते तुटतात. दगडाची भुकटी देखील हवेत उडते. यावर उपाययोजना म्हणून रस्त्याची दुरुस्तीचा प्रश्न उभा ठाकतो. त्यामुळे या वाहतुकीवर आळा घालावा तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामान्य नागरिकांनी केली आहे.