एसटी बसच्या टपावरुन जनरेटरची वाहतूक

By Admin | Updated: March 4, 2016 01:01 IST2016-03-04T01:01:07+5:302016-03-04T01:01:07+5:30

एसटी बस मधून ज्वलनशिल पदार्थाची वाहतूक करण्यास सक्त मनाई असतानाही एसटी बसच्या टपावर जनरेटर ठेवून डिजे वाजवीत एसटीतून प्रवास करणाऱ्यांनी..

Transport of generator from ST bus | एसटी बसच्या टपावरुन जनरेटरची वाहतूक

एसटी बसच्या टपावरुन जनरेटरची वाहतूक

प्रवाश्यांच्या जीवाशी खेळ : राजुरा आगाराची बस
वरोरा : एसटी बस मधून ज्वलनशिल पदार्थाची वाहतूक करण्यास सक्त मनाई असतानाही एसटी बसच्या टपावर जनरेटर ठेवून डिजे वाजवीत एसटीतून प्रवास करणाऱ्यांनी चौकाचौकात डिजेच्या तालावर ठेका देत होते. हा प्रकार अनेक नागरिकांनी बघत एसटी महामंडळाने नियम धाब्यावर ठेवल्याची चर्चा करीत होते.
राजुरा आगाराची एसटी बस प्रासंगिक करारावर देवून नागपूरकडे निघाली. तेव्हा या एसटी बसच्या टपावर जनरेटर ठेवण्यात आले होते. त्यासोबतच डिजेही बसच्या टपावर होते. जनरेटरद्वारे डिजे मोठ्या कर्कश आवाजाने चालू बस मधून वाजविण्यात येत होता. एखाद्या शहराच्या चौकात बस थांबवून त्या एसटी बस मधील प्रवासी खाली उतरुन डिजेच्या तालावर नाचत होते. हा प्रकार अनेक नागरिकांनी अनुभवला. परंतु, डिजेच्या तालावर ठेका धरणारे प्रवासी कुणाकडेही लक्ष देण्याची तसदी घेत नव्हते. डिजेच्या आवाज मर्यादेवर न्यायालयाने निर्बंध घातले असताना डिजेच्या आवाजाची मर्यादाही पाळली गेली नाही.
एसटी बसच्या टपावर ठेवण्यात आलेल्या जनरेटरमध्ये डिझेल होते. त्यामुळे ज्वलनशिल पदार्थाची एसटी बसमधून वाहतूक करण्यास कुणी परवानगी दिली असा प्रश्न उपस्थित होत आहे. सर्व नियमांना तिलांजली देत एसटी बस वरोऱ्याकडून पुढील प्रवासासाठी नागपूरकडे निघाली. प्रवाश्यांच्या जिवीताशी खेळण्याचा हा प्रकार असून एसटी बसच्या टप्पावर जनरेटर व डिजे ठेवून वाजविण्याची परवानगी दिली होती काय, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Transport of generator from ST bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.