टारपोलीनविना हायवाने कोळसा वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:33 IST2021-09-17T04:33:36+5:302021-09-17T04:33:36+5:30

घुग्घुस : पैनगंगा, मुंगोली कोळसा खाणीतून हायवा ट्रकने कोळसा वाहतूक भरदिवसा पोलीस ठाण्यासमोरून सुरू आहे. विशेष म्हणजे, टारपोलीनविनाच ही ...

Transport of coal by highway without tarpaulin | टारपोलीनविना हायवाने कोळसा वाहतूक

टारपोलीनविना हायवाने कोळसा वाहतूक

घुग्घुस : पैनगंगा, मुंगोली कोळसा खाणीतून हायवा ट्रकने कोळसा वाहतूक भरदिवसा पोलीस ठाण्यासमोरून सुरू आहे. विशेष म्हणजे, टारपोलीनविनाच ही कोळसा वाहतूक होत असून, पोलिसांचे याकडे लक्ष का जात नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

वास्तविक या रस्त्यावरून कोळसा वाहतुकीला मनाई आहे. असेे असतानाही कमी अंतर व कमी वेळात कोळसा वाहतूक व्हावी, म्हणून याच रस्त्याचा वापर केला जात आहे. शिवाय टारपोलीनचाही वापर केला जात नाही. या वाहतुकीमुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. क्षमतेपेक्षा अधिक कोळसा ट्रकमध्ये भरला जातो. टारपोलीन नसल्याने कोळसा रस्त्यावर पडतो व त्यावरून रात्रंदिवस जडवाहनांची वाहतूक सुरू असल्याने रस्त्यावर पडलेल्या कोळशाची चुरी होऊन धूळ उडत असते. दुचाकीचालकांना रस्ता दिसत नाही. त्यामुळे किरकोळ अपघात होत आहे. दुचाकी, सायकल, पायदळ चालणाऱ्यांनाही जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागते. टारपोलीन न वापरणाऱ्या जड वाहनावर मोठा दंड आकारण्याची तरतूद आहे. मात्र घुग्घुसचे वाहतूक पोलीस त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

160921\img_20210916_144201.jpg

टारपोलिन शिवाय कोळसा वाहतुक

Web Title: Transport of coal by highway without tarpaulin