बदलीपात्र शिक्षकांना अवघड क्षेत्राची धास्ती

By Admin | Updated: June 20, 2017 00:33 IST2017-06-20T00:33:07+5:302017-06-20T00:33:07+5:30

शासनाच्या २७ फेब्रुवारीच्या शासन निर्णयाविरोधात राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या समन्वय समितीने ...

The transferee teacher scared the difficult field | बदलीपात्र शिक्षकांना अवघड क्षेत्राची धास्ती

बदलीपात्र शिक्षकांना अवघड क्षेत्राची धास्ती

२२ प्राथमिक शिक्षक न्यायालयात : जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शासनाच्या २७ फेब्रुवारीच्या शासन निर्णयाविरोधात राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या समन्वय समितीने १७ जून रोजी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून सदर शासन निर्णय रद्द करण्याची मागणी केली होती. चंद्रपूर जिल्हा समन्वय समितीने मात्र आंदोलनात सहभाग घेतला नसल्यामुळे सामान्य शिक्षकांमध्ये जिल्हा शिक्षक समन्वय समितीबाबत प्रचंड नाराजी पसरली आहे.
शासनाने १८ जून २०१७ एक परिपत्रक काढून संगणीकृत जिल्हांतर्गत बदलीबाबतचे वेळापत्रक जाहीर केले असल्याने जिल्ह्यातील बदली पात्र शिक्षकांमध्ये प्रचंड धास्ती निर्माण झाली आहे. नोकरीपासून साधारण क्षेत्रात कार्य करणाऱ्या शिक्षकांची आता अवघड क्षेत्रात बदली होणार आहे. जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिवती तालुक्यासह व ज्या ठिकाणी बस सुविधा आहे, अशी गावे अवघड क्षेत्रात दाखविल्यामुळे त्यांच्या विरोधातही जिल्ह्यातील २२ शिक्षक न्यायालयात गेले आहेत.
शासनाच्या १६ जूनच्या पत्रानुसार २७ फेब्रुवारीच्या शासन निर्णयामधील विशेष संवर्ग भाग- १ मध्ये नमुद असणाऱ्या शिक्षकांसाठी १७ जून ते २१ जून या कालावधीत जिल्हांतर्गत बदलीसाठी मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकारी कार्यालयात आॅनलाईन अर्ज भरायचे आहे. मात्र जि.प.च्या बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या योग्य नसल्यामुळे शिक्षक संभ्रमात आहेत. विशेष म्हणजे जि.प.च्या शिक्षण विभागाने विषय शिक्षकांच्या पदस्थापनेची समुपदेशन प्रक्रिया ६ जून ते ८ जून २०१७ पर्यंत राबविली होती. त्यांचे आदेश शनिवारी पंचायत समितीला पाठविले आहेत. मात्र अजूनपर्यंत विषय शिक्षकांच्या हातात आदेश पडलेले नाही आणि शिक्षक नवीन शाळेवर रुजू झालेलेही नाही. त्यांनाही या बदली प्रक्रियेत समाविष्ट करायचे आहे. त्यामुळे विशेष संवर्ग भाग- १ मध्ये मोडत असलेल्या विषय शिक्षकांनी आॅनलाईन अर्ज्सा २१ जून पर्यंत कसे भरावे, हा प्रश्न त्यांना भेडसावत आहे.
त्यानंतर विशेष संवर्ग भाग-२, बदली अधिकार प्राप्त शिक्षक व बदलीपात्र शिक्षकांचे वेळापत्रक शासनाकडून येणार असल्याची माहिती आहे.

विषय शिक्षकांची ७२ पदे रिक्तच
विषय शिक्षकांच्या पदस्थापनेमध्ये विज्ञान विषयाचे चार, भाषा विषयाचे सात, व सामाजिक शास्त्र विषयाचे एक पद भरण्यात आले. तर विज्ञान विषयाचे ३३ व भाषा विषयाची २१ पदे रिक्त आहेत. तिनही विषयाची मान्य पदे ८१ असताना १९ पदे भरलेली आहेत. तर ७२ पदे रिक्त आहेत. हा एकप्रकारे अन्यायच आहे, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

विशेष संवर्गात मोडणाऱ्या शिक्षकांना
पोर्टलवर भरावी लागणार माहिती
विशेष संवर्ग भाग-१ मध्ये मोडणाऱ्या शिक्षकांना आॅनलाईन पोर्टलवर माहिती भरावी लागणार असून यामध्ये पक्षाघात, अपंग, मतिमंद मुलांचे पालक, हृदय शस्त्रक्रिया, डायलिसीन, कॅन्सरग्रस्त, आजी/ माजी सैनिक व अर्ध सैनिक जवानांची पत्नी, विधवा कर्मचारी, कुमारिका, परित्यक्त्या/ घटस्फोटीत महिला कर्मचारी, वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांचा समावेश आहे.

Web Title: The transferee teacher scared the difficult field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.