हिरापूर येथे महिला शेतकरी प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:36 IST2021-02-05T07:36:52+5:302021-02-05T07:36:52+5:30
उद्घाटन राजुराचे उपविभागीय कृषी अधिकारी गोविंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोरपनाचे तालुका कृषी अधिकारी रवींद्र डमाले, कृषी ...

हिरापूर येथे महिला शेतकरी प्रशिक्षण
उद्घाटन राजुराचे उपविभागीय कृषी अधिकारी गोविंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोरपनाचे तालुका कृषी अधिकारी रवींद्र डमाले, कृषी सहायक रेणुका कोकणे, बिबी येथील प्रगतिशील शेतकरी हबीब शेख, उषाताई काळे, पोलीस पाटील योगीता टिपले, सहायक शिक्षक प्रशांत गोखरे, सहायक शिक्षक सुनील अलोणे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक माधव वाघमारे आदी उपस्थित होते. प्रशिक्षण शिबिरात उपविभागीय कृषी अधिकारी गोविंद मोरे यांनी शासकीय योजना, हरभरा, सोयाबीन बिज उत्पादन, सेंद्रिय भाजीपाला लागवड याविषयासह विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. बिबी येथील प्रगतशील शेतकरी हबीब शेख यांनी बहुपीक पद्धतीने भाजीपाला लागवड,
वनस्पतीजन्य कीटकनाशक घरच्या घरी करण्याबाबत माहिती दिली.
यावेळी हिरापूर येथील महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. संचालन बबिता वाघमारे, तर प्रास्ताविक लता काळे यांनी केले. उपस्थितांचे आभार जयश्री डाहुले यांनी मानले.