फळ प्रक्रिया उद्योगावर प्रशिक्षण

By Admin | Updated: May 10, 2014 00:08 IST2014-05-10T00:08:51+5:302014-05-10T00:08:51+5:30

कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा आत्मा योजनेअंतर्गत सिंदेवाही येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये शेतकरी प्रशिक्षण फळ प्रक्रिया उद्योग...

Training on the fruit processing industry | फळ प्रक्रिया उद्योगावर प्रशिक्षण

फळ प्रक्रिया उद्योगावर प्रशिक्षण

 सिंदेवाही : कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा आत्मा योजनेअंतर्गत सिंदेवाही येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये शेतकरी प्रशिक्षण फळ प्रक्रिया उद्योग या विषयावर आयोजित करण्यात आले. अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक एस.एन. पोतकिले तर मार्गदर्शक म्हणून फळ प्रक्रिया विशेष तज्ज्ञ वंदना काळे, किटकशास्त्रज्ञ डॉ. एच.आर. सवई, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक एस.एच. होले उपस्थित होते. सर्वप्रथम तंत्रज्ञान व्यवस्थापक होले यांनी प्रास्ताविकात प्रशिक्षणाबाबत माहिती दिली. विशेष तज्ज्ञ वंदना काळे यांनी आंबा, हळद, फणस, बोर, संत्रा, चिंच व बाजारात उपलब्ध असलेल्या काही फळांवर प्रक्रिया करून लोणचे बनविण्याविषयी मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी टमाटर फळाची प्रक्रिया करून टोमॅटो सॉस व टोमॅटो पावडर कसे बनवायचे, त्याची पॅकिंग कशा पद्धतीने करावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. सवई (किटक शास्त्रज्ञ) यांनी भात लागवड व तंत्रज्ञान तसेच किड व रोग व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. भिसे यांनी खरीप पिकाची लागवड, बिज प्रक्रिया व फळ प्रक्रियाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. पोतकिले यांनी फळबाग लागवड व तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले. संचालन कृषी तज्ज्ञ एस.वाय. भडके तर आभार विषय तज्ज्ञ जे.पी. झोडे यांनी मानले. प्रशिक्षण यशस्वी करण्याकरिता कृषी सहाय्यक कुमारी बोंकुलवार, बंधवार, पतरंगे, गजभिये, गणवीर यांनी विशेष परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Training on the fruit processing industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.