कोरपना येथे शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 23:41 IST2018-05-30T23:41:37+5:302018-05-30T23:41:46+5:30

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) २०१८-२०१९ अंतर्गत कृषी विभागामार्फत ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ मोहिमेदरम्यान कोरपना येथील श्रीकृष्ण सभागृहात शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

Training for farmers in Korpana | कोरपना येथे शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण

कोरपना येथे शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क
कन्हाळगाव : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) २०१८-२०१९ अंतर्गत कृषी विभागामार्फत ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ मोहिमेदरम्यान कोरपना येथील श्रीकृष्ण सभागृहात शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर, तालुका कृषी अधिकारी विलास वानखेडे, कृषी विस्तार अधिकारी सी. एम. ठाकरे, डॉ. सोनाली लोखंडे व अन्य मान्यवर उपस्थित होते. डॉ. मानकर यांनी गुलाबी बोंड अळीवर नियंत्रणाकरिता उपाययोजना कशी करावी, याची माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी वानखेडे यांनी कृषी विभागाच्या योजनांच्या उपयोगितेवर विचार मांडले. सिंदेवाही येथील कृषी विज्ञान केंद्राच्या डॉ. सोनाली लोखंडे यांनी माती परिक्षणाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. संचालन आर. एस. ठाकूर यांनी केले. आभार सी. एम. हिवसे यांनी मानले. यावेळी बी.एन. वैद्य, जी. एम. सोनवने, डी. बी. गांदगीवार उपस्थित होते.
कृषी विभागाच्या योजनांची दिली माहिती
चिंधिचक : कृषी विभागाअंतर्गत ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ अभियानाअंतर्गत जनकापूर येथे जागृती सभा घेण्यात आली. यावेळी तालुका कृषी अधिकारी आमले, सरपंच पुरुषोत्तम काशिवार, कृषी सहायक गवई, देशमुख उपस्थित होते. हंगामपूर्व शेतीची मशागत, बिज प्रक्रिया आणि कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती शेतकºयांना देण्यात आली. शिबिराप्रसंगी ग्रा.पं. उपसरपंच सचिन मसराम, अशेक पा. बोरकर, लहुजी रामटेके, ज्ञानेश्वर पडोळे, रोशन रामटेके आदी उपस्थित होते. संचालन डी. बी. देशमुख यांनी केले. राहुल रामटेके यांनी आभार मानले.

Web Title: Training for farmers in Korpana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.