घरकुलाच्या बिलासाठी लाभार्थ्यांची भटकंती
By Admin | Updated: April 12, 2016 03:42 IST2016-04-12T03:42:13+5:302016-04-12T03:42:13+5:30
जिवती तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांना शासनातर्फे घरकूल मंजूर झाले. नवे घर मिळणार म्हणून लाभार्थ्यांनी राहत्या

घरकुलाच्या बिलासाठी लाभार्थ्यांची भटकंती
पाटण: जिवती तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांना शासनातर्फे घरकूल मंजूर झाले. नवे घर मिळणार म्हणून लाभार्थ्यांनी राहत्या घराचे छत खोलले. पदरमोड करून साठवलेल्या पैशातून कामही सुरू केले, मात्र सज्जा लेव्हलपर्यंर बांधकाम पोहोचूनही पहिला हप्ताही मिळाला नाही. त्यामुळे हे लाभार्थी आता आर्थिक अडचणीत सापडले आहेत. नव्या घराच्या आशेने राहते घरही तोडल्याने आता अनेकांवर कुटुंबासह गोठ्यात रहण्याची पाळी आली आहे.
जिवती तालुक्यातील चिखली (बु.) ग्रामपंचायत अंतर्गत नाईकनगर येथील लाभार्थी पीकाबाई अमृत चव्हाण यांच्या घरकुलाची अवस्था अशीच झाली आहे. त्यांना घरकूल मंजूर झाले. स्वत:च्या खर्चातून काम सुरू केले. बांधकाम सज्जापर्यंत पोहचले मात्र अद्यापही घरकुलाचा पहिला हप्ता मिळालेला नाही. जवळचा पैसाउरलेला नाही. कधी मिळाणर हे कुणी अधिकारी सांगायला तयार नाही. गावताीलच नीलकंठ गावटू जाधव या लाभार्थ्यांच्या घरकुलाचा जोता झाला आहे. त्यांनाही पहिला हप्ता मिळालेला नाही. याच ग्रामपंचायत अंतर्गत रेंगागुडा गावातील घरकुल लाभार्थी सोनेराव मंगू सलाम यांच्या घरकुलाचा फक्त जोता झाला आहे. तरीही त्ाांंना दोन हप्ताचे ७० हजार रुपये मिळाले. मात्र ते घरकुल अपूर्ण अवस्थेत आहे. (वार्ताहर)
हप्त्यासाठी द्यावी लागते चिरीमिरी
४घरकुलाचे काम न होताही काही लाभार्थ्यांना दोन ते तीन हप्ते देण्यात आले आहेत, मात्र व प्रत्यक्षात घरकुलाचे काम पूर्ण झाले अशांना घरकुलाच्या हप्त्यासाठी चकरा माराव्या लागतात. अधिकारी व कर्मचाऱ्यांना चिरीमिरी द्यावे लागते. यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाही करावी अशी प्रतिक्रिया पंचफुला सुधाकर जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
या दोन लाभार्थ्यांचे हप्ते आम्ही २८ मार्च २०१६ ला पाटण येथील स्टेट बँकेत पाठविले आहे.
-गवळी, संवर्ग विकास अधिकारी, जीवती
वरील दोन व्यक्तींचा घरकुलाचा चेक अजूनपर्यंत बँकेत आलेला नाही.
-शाखा व्यवस्थापक
भारतीय स्टेट बँक, पाटण