राजुरा-आसिफाबाद मार्गाची वाहतूक १३ तास ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 23:37 IST2018-04-27T23:37:04+5:302018-04-27T23:37:16+5:30
राजुरा-आसिफाबाद राज्य महामार्गावर दोन वाहनांमध्ये जोरदार धडक झाल्याने तब्बल १३ तास वाहतूक ठप्प झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजता घडली.

राजुरा-आसिफाबाद मार्गाची वाहतूक १३ तास ठप्प
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : राजुरा-आसिफाबाद राज्य महामार्गावर दोन वाहनांमध्ये जोरदार धडक झाल्याने तब्बल १३ तास वाहतूक ठप्प झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजता घडली. मुख्य मार्गावर अडथळा ठरलेल्या ट्रेलरला कापून काढायला बराच उशिर झाल्याने राजुरा-आसिफाबाद मार्गावर शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
राजुरा ते आसिफाबाद या राज्य महामार्गावरून दररोज शेकडो वाहने धावतात. शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास लक्कडकोट घाटाजवळ दोन वाहनांमध्ये जोरदार धडक झाली. या धडकेत एक वाहन रस्त्यावरच पडला. त्यामुळे दोन्ही बाजूने शेकडो वाहनांची रांग लागली होती. वाहनाला बाजुला करण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने अखेर अपघातग्रस्त वाहनाच्या समोरचा भाग कापून काढावा लागला. त्यानंतरच वाहतूक सुरू झाली. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शेकडो वाहने दोन्ही मार्गावर उभ्या राहिल्याने वाहतूक पूर्णत: ठप्प झाली होती. पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करून हा मार्ग मोकळा केला.