रेल्वे क्रॉसिंगवरील वाहतूक कोंडीने नागरिक वैतागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:21 IST2021-01-10T04:21:38+5:302021-01-10T04:21:38+5:30

रेल्वेक्रॉसिंगवरील सततच्या वाहतूक कोंडीच्या समस्येची दखल आजतागायत कुणीही घेतली नाही. तसेच कुणीही दखल घेताना दिसत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस रेल्वे ...

Traffic jams at railway crossings have annoyed citizens | रेल्वे क्रॉसिंगवरील वाहतूक कोंडीने नागरिक वैतागले

रेल्वे क्रॉसिंगवरील वाहतूक कोंडीने नागरिक वैतागले

रेल्वेक्रॉसिंगवरील सततच्या वाहतूक कोंडीच्या समस्येची दखल आजतागायत कुणीही घेतली नाही. तसेच कुणीही दखल घेताना दिसत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस रेल्वे क्रॉसिंगवर वाहतूक कोंडी होण्याचे प्रमाण वाढले असल्याने नागरिकांना, वाहनचालकांना विनाकारण त्रास होऊन तासन्‌ता‌स ताटकळत उभे राहावे लागत आहे. सदर मार्ग हा राज्य महामार्ग असून गडचिरोली ते नागपूर असा हा मार्ग आहे. तसेच ब्रम्हपुरी तालुक्यातील अनेक गावे या मार्गावर असल्याने रहदारी या मार्गाने मोठ्या प्रमाणावर असते. नागरिकांची, वाहनांची, विद्यार्थ्यांची वर्दळ असते.

सध्याच्या परिस्थितीत फक्त मालगाडी, तसेच लांब पल्याच्या सुपरफास्ट रेल्वे गाड्या या मार्गाने चालू आहेत. भविष्यात लोकल रेल्वे गाड्या सुरू झाल्यास सदर रेल्वे क्रॉसिंगवर जटील समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे या गंभीर समस्येकडे पालकमंत्री विजय वडेट्टीवार तसेच खासदार अशोक नेते यांनी जातीने लक्ष देऊन यावर उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

बॉक्स

गतिरोधकाची उंची कमी करावी

सध्याच्या परिस्थितीत तात्काळ रेल्वे क्रॉसिंगवर बनविण्यात आलेल्या एका गतिरोधकाची उंची कमी करावी. या गतिरोधकावरून वाहने उतरताना नादुरुस्त होतात व वाहतूक कोंडी होते. उंची कमी केल्यास वाहने बिघडणार नाहीत आणि वाहतुकीची कोंडी होणार नाही. परंतु निर्माण करण्यात आलेल्या गतिरोधकाची उंची कमी करण्यासाठी कोणताही विभाग पुढाकार घ्यायला तयार नाही. त्यामुळे वारंवार याठिकाणी वाहतूक कोंडी होऊन वाहतूक व्यवस्था ठप्प होत आहे. रेल्वे क्रॉसिंगवर रस्ता अरुंद असल्याने वाहन नादुरुस्त जर झाला तर दुसऱ्या बाजूने मोठे वाहन जाऊ शकत नाही. कारण सदर मार्ग अरुंद आहे. म्हणजेच सदर ठिकाणावारील रस्त्याचे रुंदीकरण तरी करायला पाहिजे परंतु तेही होताना दिसत नाही. त्यामुळे नागरिकांना,वाहनचालकांना वारंवार सदर गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

Web Title: Traffic jams at railway crossings have annoyed citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.