रेल्वे फाटकामुळे प्रवाशांना डोकेदुखी

By Admin | Updated: February 25, 2015 01:29 IST2015-02-25T01:29:27+5:302015-02-25T01:29:27+5:30

तालुक्यात विसापूर हे सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीचे गाव आहे. येथून चेन्नई-दिल्ली, दिल्ली- चेन्नई व बल्लारशाह- गोंदिया या तीन रेल्वे लाईन आहेत.

Traffic headaches cause headaches | रेल्वे फाटकामुळे प्रवाशांना डोकेदुखी

रेल्वे फाटकामुळे प्रवाशांना डोकेदुखी

बल्लारपूर : तालुक्यात विसापूर हे सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीचे गाव आहे. येथून चेन्नई-दिल्ली, दिल्ली- चेन्नई व बल्लारशाह- गोंदिया या तीन रेल्वे लाईन आहेत. त्यामुळे विसापूर गावाची दोन भागात विभागणी झाली. या रेल्वेलाईनवरुन दररोज शेकडो रेल्वे गाड्या धावतात. परिणामी येथील रेल्वे फाटक नेहमीच कुलूप बंद राहत असल्याने प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे. यावर उपाययोजना करण्याची मागणी आहे.
विसापूरची लोकसंख्या १५ हजारांवर आहे. गावातून तीन रेल्वे लाईन गेल्याने दर मिनीटाला रेल्वे फाटक बंद असते. यामुळे वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. गावाची विभागणी दोन भागात झाल्याने येथील नागरिकांना समस्येला सामोरे जावे लागत आहेत. अशातच विसापूर फाट्यावर टोल नाका सुरू झाल्याने बल्लारपूरकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या लक्षात घेता येथून ये-जा करीत असल्याने वाहतूक वाढली आहे. याचा फटका रेल्वे फाटकांमुळे प्रवाशांना व वाहन चालकांना बसत आहे.
गावकऱ्यांना रेल्वे फाटकाच्या जाचातून मुक्त करण्यासाठी उड्डाण पुलाची मागणी अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधींकडे करण्यात आली. आता लवकरच ग्रामपंचायतीजवळ प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात येणार असून रुग्णांना रेल्वे फाटकाचा त्रास होणार आहे. रेल्वे फाटक बंद राहत असल्याने यापूर्वी ये-जा करणाऱ्या नागरिकांना रेल्वे अपघाताला सामोरे जाऊन जीव गमवावा लागला आहे.
मात्र या गंभीर समस्येकडे आजतागायत कोणत्याही लोकप्रतिनिधीचे लक्ष गेले नाही. आतातरी किमान ये-जा करणाऱ्या नागरिकांना रेल्वे फाटकाच्या जाचातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)
अपघात वाढले
विसापूर येथे तीन रेल्वे मार्ग आहेत. दर दिवशी येथील तीनही रेल्वे मार्गावरुन शेकडोवर रेल्वे गाड्यांचे आवागमन होते. या रेल्वे मार्गामुळे विसापूर हे गाव दोन भागात विभागले गेले आहे. मध्ये रेल्वे फाटक आहे. त्यातून नागरिकांची ये-जा सुरू असते. अपघातांच्या घटनाही घडत आहेत. नागरिकांसोबतच वाहन चालकांना त्रासाला बळी पडावे लागत आहेत.
उड्डाण पुलाची गरज
विसापूर या गावात १५ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या आहे. विसापूर येथील दोनही भागातील नागरिकांना या रेल्वे फाटकातूनच ये-जा करावी लागते. याव उपाययोजना म्हणून व दोन भागाना जोडणारा दुवा म्हणून रेल्वे लाईन दरम्यान उड्डाण पूल बांधण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे यांनी रेल्वे प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून केली आहे.

Web Title: Traffic headaches cause headaches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.