भरधाव ट्रॅक्टरने पादचाऱ्याला चिरडले

By Admin | Updated: December 25, 2014 23:30 IST2014-12-25T23:30:27+5:302014-12-25T23:30:27+5:30

पायदळ घरी जात असलेल्या एका इसमाला ट्रॅक्टरने धडक दिली. यात सदर इसम ट्रॅक्टरखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी रास्तारोको केला. अखेर पोलिसांना

Traffic crashed to the pedestrians | भरधाव ट्रॅक्टरने पादचाऱ्याला चिरडले

भरधाव ट्रॅक्टरने पादचाऱ्याला चिरडले

चंद्रपूर : पायदळ घरी जात असलेल्या एका इसमाला ट्रॅक्टरने धडक दिली. यात सदर इसम ट्रॅक्टरखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी रास्तारोको केला. अखेर पोलिसांना दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करून वाहतूक सुरळीत करावी लागली. ही घटना आज बुधवारी सकाळी १० वाजता बायपास मार्गावरील सिध्दार्थ नगरजवळ घडली.
बाबू बोरम (५४) रा. लालपेठ कॉलरी असे मृताचे नाव आहे. बाबू बोरम हे आज सकाळी १० वाजताच्या सुमारास आपल्या एका नातेवाईकाचा अंतिम संस्कार करून घराकडे जात होते. दरम्यान ट्रॅक्टरने (क्रमांक एमएच ३४ एल ३३०४) त्यांना धडक दिली. यात ते ट्रॅक्टरखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर ट्रॅक्टरचालक फरार झाला. त्यामुळे संतप्त नागरिकांनी आरोपीला अटक करण्याची मागणी करीत वाहतूक अडवून ठेवली. त्यानंतर पोलिसांनी दंगा नियंत्रण पथकाला पाचारण केले. या पथकाने नागरिकांना शांत करीत वाहतूक सुरळीत केली. मात्र अर्धा तास वाहतूक ठप्प असल्याने वाहनांची रांग लागली होती.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Traffic crashed to the pedestrians