तीन गावांच्या सीमेवर झाले पारंपरिक गायगोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 11:42 PM2019-10-29T23:42:09+5:302019-10-29T23:43:07+5:30

गुरांना वन्यप्रान्यांपासुन त्रास होवू नये, गुरे रानात हरवू नयेत, त्यांचे रक्षण व्हावे व कोणतेही संकट वारंवार येवू नये म्हणून गायगोधन व पूजा करून देवाला प्रसन्न करतात. पूजा करताना गायगोदनात कोंबडीचे पिल्लू व अंडी ठेवतात. त्यावर गायी खेळवितात. गायी खेळविताना अंडी व पिल्लांना इजा झाली नाही तर गायगोधन साधली, अशी गोवारी जमातीची श्रद्धा आहे.

Traditional singing took place at the border of three villages | तीन गावांच्या सीमेवर झाले पारंपरिक गायगोधन

तीन गावांच्या सीमेवर झाले पारंपरिक गायगोधन

Next
ठळक मुद्देचारशे वर्षांचा इतिहास : १२ गावातील आदिवासी गोवारी समाज बांधवांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
घोडपेठ : परिसरातील निंबाळा, घोट व हेटी गावांच्या सीमेवर बलिप्रतिपदेला गायगोधन पूजा करण्याची चारशे वर्षांची परंपरा आजही सुरू आहे. यंदाच्या गायगोधन पूजेला आदिवासी गोवारी समाज पारंपरिक वेशभूषेत श्रद्धेने सहभागी झाले होते. चपराळा, चालबर्डी, घोट, निंबाळा, हेटी, लोणारा (गोंड), लोणारा (पारखी), कचराळा, चपराडा, मानोरा, मोहबाळा आणि परिसरातील १२ गावांमधील गोपालक आपल्या गायींना घेऊन पूजेसाठी एकत्र येऊन ही पूजा करण्यात आली.

ढाल पूजेचा हेतू
गुरांना वन्यप्रान्यांपासुन त्रास होवू नये, गुरे रानात हरवू नयेत, त्यांचे रक्षण व्हावे व कोणतेही संकट वारंवार येवू नये म्हणून गायगोधन व पूजा करून देवाला प्रसन्न करतात. पूजा करताना गायगोदनात कोंबडीचे पिल्लू व अंडी ठेवतात. त्यावर गायी खेळवितात. गायी खेळविताना अंडी व पिल्लांना इजा झाली नाही तर गायगोधन साधली, अशी गोवारी जमातीची श्रद्धा आहे.

गोवारी समाजाचे आणि गोवर्धन पूजेचे अस्तित्व राखण्यासाठी दरवर्षी बलिप्रतिपदेला पूजा केली जाते. ४०० वर्षांपासून आदिवासी गोवारी समाज देशातील तरूणांना गायी व शेतीचे महत्त्व गायगोधन पूजेच्या माध्यमातून समजावून सांगत आहे.
- विलास राऊत, सचिव, ग्रामीण विकास सेवा समिती निंबाळा (हेटी)

अशी होते पूजा
दीपावलीच्या चौथ्या दिवशी बलिप्रतिपदेला गायगोधन पूजेचा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी सकाळी घरी गायींची पूजा केली जाते. त्यानंतर सार्वजनिक पूजेसाठी गायींना गायगोधन पूजा पटांगणावर आणले जाते. शेणापासून एक मोठी भुरसी बनविण्यात येते. गायगोधन पूजेमध्ये या भुरसीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या भुरसीमध्ये एक अंडे व कोंबडीचे लहान जिवंत पिल्लू ठेवण्यात येते. पिलाचे धड शेणामध्ये दाबलेले असते. मानेचा भाग खुला ठेवण्यात येतो. अंदाजे एक फुटाच्या अकरा काड्यांचे अंडे व पिल्लाच्या सभोवती कुंपण केल्या जाते.

Web Title: Traditional singing took place at the border of three villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.