दोन एकरातील कापसावर फिरविला ट्रॅक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:43 IST2020-12-12T04:43:32+5:302020-12-12T04:43:32+5:30
गोवरी : कापसाच्या गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने हतबल झालेल्या पंचाळा येथील शेतकरी तुषार गुलाबराव चौथले यांनी दोन ...

दोन एकरातील कापसावर फिरविला ट्रॅक्टर
गोवरी : कापसाच्या गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने हतबल झालेल्या पंचाळा येथील शेतकरी तुषार गुलाबराव चौथले यांनी दोन एकरातील कापसाच्या पिकावर ट्रॅक्टर फिरविला.
तुषार चौथले यांनी आपल्या शेतात दोन एकर शेतात कपाशीची लागवड केली होती. मात्र ऐनवेचणी करायच्या वेळेला गुलाबी बोंडअळी लागली. अळीमुळे शेती उद्धवस्त झाल्याने खर्च वाया गेला. लागवड खर्चही भरून निघणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने दोन एकरमधील पिकावर ट्रॅक्टर फिरवून कापसाचे पीक काढून टाकले.
कापूस पिकावर शेतकºयांनी सुरुवातीपासूनच बराच खर्च केला. परंतु यावर्षी कापूस वेचणी करायच्या आधीच कापूस पिकांवर गुलाबी बोंडअळीने आक्रमण केले. राजुरा तालुक्यात डिसेंबर महिन्यात बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने कापसाचे नुकसान झाले आहे.