शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
5
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
6
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
7
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
8
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
9
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
10
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
13
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
14
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
15
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
16
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
17
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
18
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर

ताडोबात येणाऱ्या पर्यटकांना सेलिब्रिटी 'माया'च्या जागी आली आता 'छोटी तारा'ची भुरळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 11:29 IST

Chandrapur : पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या वाघिणीचा फोटो डाक विभागाने टपाल तिकिटावर केला प्रकाशित

राजकुमार चुनारकर लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर (जि. चंद्रपूर) : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात एकेकाळी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरलेल्या बेपत्ता 'माया' (टी १२) वाघिणीचा अजूनही ठावठिकाणा लागला नाही. मात्र, मायाची जागा आता छोटी ताराने घेतली. तिनेही आता देश विदेशातील पर्यटकांसह वन्यजीव अभ्यासकांवरही जणू गारुड केले आहे.

ताडोबात सफारीसाठी येणाऱ्या पर्यटकांना भुरळ घालणारी ताडोबाची राणी माया वाघीण ऑगस्ट २०२४ पासून बेपत्ता झाली आहे. ती बेपत्ता झाली की तिच्यासोबत बहेलिया टोळीकडून काही घातपात झाला, याबाबत तर्कवितर्क लावणे अद्याप थांबले नाही. ती शेवटची २५ ऑगस्ट २०२३ रोजी पंचधारा लोकेशनवर काही मजुरांना दिसली होती. ताडोबामधील 'मटकासुर' हा वाघ तिचा जोडीदार होता.

पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या या वाघिणीचा फोटो डाक विभागाने टपाल तिकिटावर प्रकाशित केला आहे. ताडोबाची अनभिषिक्त राणी माया वाघिणीची रसभरीत जीवनकहाणी ग्रंथरुपातही वाचकांसमोर आली. परंतु, ती परत येण्याची शक्यता मावळल्याने तिची जागा आता छोटी तारा घेऊ लागली आहे.

अशी आहे छोटी तारा....

  • गळ्यात रेडिओ कॉलरचा पट्टा लावणारी ताडोबातील पहिली वाघीण असा लौकिक छोटी ताराने मिळवला आहे.
  • 'वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'च्या वतीने पूर्व विदर्भातील काही निवडक वाघांच्या गळ्यात पट्टा लावून वाघांचा अभ्यास केला जात आहे.
  • नर वाघांनाच हा पट्टा लावण्यात आला होता. गळ्यात रेडिओ कॉलरचा पट्टा लावणारी ताडोबातील छोटी तारा ही पहिली ठरली आहे. आता तिचा कॉलर पट्टा काढला आहे.

रुबाबदारपणा कायम'बिजली' व 'रोमा' या छोटी ताराच्या दोन मुली, तर छोटा मटका मुलगा आहे. ती आता उतारवयाकडे झुकली आहे. मात्र तिचा रुबाबदारपणा टिकून आहे.

"एकेकाळी ताडोबातील पंढरपौनी भागात पर्यटनासाठी आले की, माया वाघिणीचे हमखास दर्शन व्हायचे. तिच्या अनेक मुद्रा डोळ्यांत साठवल्या. आता छोटी ताराने मायाची उणीव भरून काढली आहे."- केशव करापूरकर, वन्यजीवप्रेमी, मुंबई

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरTadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प