शिक्षकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार
By Admin | Updated: December 2, 2014 23:03 IST2014-12-02T23:03:27+5:302014-12-02T23:03:27+5:30
शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर शिक्षकाने शाळेतच अत्याचार केल्याची घटना येन्सा येथील जिल्हा परिषद शाळेत सोमवारी उघडकीस आली. याबाबत वरोरा पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर शिक्षकावर

शिक्षकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार
येन्सा शाळेतील घटना : गुन्हा दाखल, शिक्षक फरार
वरोरा : शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर शिक्षकाने शाळेतच अत्याचार केल्याची घटना येन्सा येथील जिल्हा परिषद शाळेत सोमवारी उघडकीस आली. याबाबत वरोरा पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षक अद्याप फरार असून शिक्षकाला अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
तालुक्यातील येन्सा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता १ ते ८ पर्यंतचे वर्ग असून १७९ मुल-मुली शाळेत शिक्षण घेत आहे. गत आठ वर्षापासून गौतम आडकुजी गेडाम हे सहाय्यक शिक्षक म्हणून येथे कार्यरत आहे. या शिक्षकाने २७ नोव्हेंबर रोजी इयत्ता सातवीमध्ये शिकणाऱ्या मुलींशी असभ्य वर्तणूक करत इंग्रजी पाढे म्हणण्यास लावले. पाढे आले नाही म्हणून विद्यार्थिनीला वर्गात उभे करुन तिच्यावर शारिरीक अत्याचार केले. हा प्रकार शिक्षकाकडून घडतच राहिल्याने विद्यार्थ्यांनी ही बाब आपल्या पालकांना सांगितली. त्यामुळे ग्रामस्थांनी अत्याचारग्रस्त मुलींना घेवून पोलिसात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी गौतम गेडाम या शिक्षका विरुद्ध कलम ३५४ (अ) सहकलम ८/७ (क) तसेच बालक लैगिंग संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून सदर शिक्षक फरार झाला आहे. त्याच्या मागावर पोलीस पथक रवाना झाले आहे. शिक्षकाला जोपर्यंत अटक करणार नाही, तोपर्यंत मुलांना पाठविणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. त्यामुळे अधिकारी तत्काळ गावात दाखल होवून शिक्षकाला लवकरच अटक करण्याचे आश्वासन दिले. शिक्षण विस्तार अधिकारी आर. आर. चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता, घटना घडल्याची माहिती होताच शाळेला भेट दिली. शिक्षक गेडाम किरकोळ रजेवर होते. वर्ग पाच ते आठचे अध्यापन देवून नये, असा आदेश मुख्याध्यापकांना देण्यात आला आहे, असे सांगितले. (तालुका प्रतिनिधी)