शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मुसळधार पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 05:00 IST

रविवारी जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस पडला होता. त्यानंतर सोमवारी सकाळपासून ऊन्ह तापू लागले. दरम्यान, दुपारी २ वाजतापासून अचानक वातावरणात बदल होऊ लागला. ढगाळ वातावरण तयार झाले आणि दुपारी ३ वाजतापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आज होळी असल्यामुळे र

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात सर्वत्र होळी उत्साहात साजरी होत असतानाच दुपारी ३ वाजताच्या सुमारास चंद्रपूरसह जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. कुठे तासभर तर कुठे अर्धा तास पाऊस बरसत राहिला. अचानक पाऊस आल्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली. जिल्हाभरातील शेतपिकांचेही मोठे नुकसान झाले.रविवारी जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस पडला होता. त्यानंतर सोमवारी सकाळपासून ऊन्ह तापू लागले. दरम्यान, दुपारी २ वाजतापासून अचानक वातावरणात बदल होऊ लागला. ढगाळ वातावरण तयार झाले आणि दुपारी ३ वाजतापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आज होळी असल्यामुळे रस्त्यावर रंगांची दुकाने सजली होती. मात्र अचानक पाऊस आल्यामुळे छोट्यामोठ्या व्यावसायिकांची तारांबळ उडाली. चंद्रपूरसह भद्रावती, वरोरा, चिमूर, सिंदेवाही, मूल, नागभीड, बल्लारपूर, राजुरा, गोंडपिपरी, कोरपना आदी तालुक्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. सध्या शेतात रबी हंगामाचे पीक आहे. याशिवाय काही शेतकऱ्यांनी धानाचे दुबार पीकही लावले आहेत. खरीप हंगामातील कापूसही अनेकांच्या शेतात आहे. सोमवारी अचानक आलेल्या पावसामुळे या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने नुकसानग्रस्त पिकांचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. भद्रावती तालुक्यात झालेल्या वादळी पावसाने रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले. विंजासन परिसरात जगन दानव, सुनील पायघन यांच्या शेतातील ज्वारी, गहू या पिकांचे नुकसान झाले. संपूर्ण पीक आडवे झाले आहे. घोडपेठ व परिसरातील तिरवंजा, कवठी, कचराळा, गुंजाळा, चालबर्डी, चपराळा, निंबाळा या गावांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले. सध्या शेतातील हरभरा पीक काढणीला आलेले आहे. मात्र या अकाली पावसाने शेतकºयांचा हातचा घास हिरावला आहे. शासनाने सर्वेक्षण करावे, अशी मागणी आहे.विटा व्यावसायिकांना फटकापोंभुर्णा : तालुक्यातील सर्वच भागात सोमवारी सायंकाळी ५ वाजता मेघगर्जना होवून जोरदार पावसाला सुरूवात झाली. पावसामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले. या पावसाचा सर्वाधिक फटका विटा व्यवसायिकांना बसला. शेतकºयांच्या शेतात असलेले मुंग, हरभरा व अन्य पीक यावर ताडपत्री न टाकल्याने प्रचंड नुकसान झाले. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विटा व्यवसाय चालतो. पावसामुळे विटाभट्टीत पाणी शिरले. यात त्यांचे मोठे नुकसान झाले.होळीच्या आनंदावर विरजणसोमवारी सर्वत्र होळीचा उत्साह होता. चंद्रपूरसह गावागावात या दिवशी सायंकाळी होलिका दहन केले जाते. यासाठी नागरिकांनी आपापल्या वार्डात सकाळपासून लाकडे गोळा करून आणली व होळी पेटविण्यासाठी रचून ठेवली होती. मात्र काही ठिकाणी दुपारी व काही ठिकाणी सायंकाळच्या सुमारास अचानक मुसळधार पाऊस आल्याने संपूर्ण लाकडे ओली झाली. अनेकांच्या होळी पेटविण्याच्या जागेवरही चिखलाचे साम्राज्य तयार झाले. पावसामुळे होळीच्या आनंदावर विरजण पडले.

टॅग्स :Socialसामाजिक