तोरगाव बु. येथे चंदन बियाणे लागवड
By Admin | Updated: June 27, 2015 01:30 IST2015-06-27T01:30:40+5:302015-06-27T01:30:40+5:30
कृषी विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर तर्फे नाविन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत चंदन बियाणे लागवड, ...

तोरगाव बु. येथे चंदन बियाणे लागवड
ब्रह्मपुरी : कृषी विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर तर्फे नाविन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत चंदन बियाणे लागवड, संगोपन, बाजार मूल्य भावाबाबत मार्गदर्शन शिबिर व चंदन बियाणे वाटप कार्यक्रम ग्राम पंचायत तोरगाव येथे आयोजित करण्यात आला.
कृषी विकास अधिकारी प्रवीण देशमुख तथा कृषी समितीच्या सभापती कल्पना बोरकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमातंर्गत शेतकऱ्यांना चंदन बियाणे लागवड विषयक तांत्रिक माहिती देऊन चंदनाची झाडे क्वचितच आढळत असलेल्या ब्रह्मपुरी तालुक्यात मोठ्या संख्येने चंदनाची लागवड यशस्वी करण्याकरिता उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मोफत चंदनाचे बियाणेसुद्धा वाटप करण्यात आले. कुठल्याही शासकीय योजनेचा आधार न घेता एक नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच चंदन लागवडीतून मिळणाऱ्या आर्थिक नफ्याद्वारे एक शेतीला उत्तम पुरक उपक्रम म्हणून चंदनाची लागवड केल्यास शेतकऱ्यांना अधिक आर्थिक नफा मिळू शकतो, याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सदर मार्गदर्शनादरम्यान शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या विविध प्रश्नांचेसुद्धा निराकरण कार्यक्रमस्थळी करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी समिती सभापती कल्पना बोरकर यांनी केले तर अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती नेताजी मेश्राम यांनी भूषविले. महेंद्र घागरे यांनी मार्गदर्शन केले.(तालुका प्रतिनिधी)