शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

महाविद्यालयातही गुंजतो आता प्रार्थनेचा स्वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 6:00 AM

प्राथमिक शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये प्रार्थना घेणे फार पूर्वीपासून सक्तीचे करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना शिस्त लावणे त्याचबरोबर त्यांचे अध्यापनात मन लागावे हा या प्रार्थनेमागे उद्देश असावा. मात्र जशी शाळांमध्ये प्रार्थना घेण्यात येते, तशी प्रार्थना महाविद्यालयात होेत नव्हती. महाविद्यालयात प्रार्थनेचे बंधन नसल्यामुळे कोणतेही महाविद्यालय प्रार्थना घेत नव्हते.

ठळक मुद्देशासनाचे आदेश : तरुणांनाही लागेल शिस्त

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : प्रार्थना मनशांंतीचे उत्तम माध्यम आहे. तसेच ते शिस्त लावण्याचे साधनही आहे. म्हणूनच शाळा, शासकीय कार्यालय व सार्वजनिक प्रतिष्ठाणांमध्ये प्रार्थना घेण्याची प्रथा रूढ झाली असावी. पण आता प्रार्थनेचा हाच स्वर महाविद्यालयातही गुंजायला लागला आहे.प्राथमिक शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये प्रार्थना घेणे फार पूर्वीपासून सक्तीचे करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना शिस्त लावणे त्याचबरोबर त्यांचे अध्यापनात मन लागावे हा या प्रार्थनेमागे उद्देश असावा. मात्र जशी शाळांमध्ये प्रार्थना घेण्यात येते, तशी प्रार्थना महाविद्यालयात होेत नव्हती. महाविद्यालयात प्रार्थनेचे बंधन नसल्यामुळे कोणतेही महाविद्यालय प्रार्थना घेत नव्हते. महाविद्यालयात प्रार्थना होत नसल्यामुळे विद्यार्थीही आपापल्या सोयीने महाविद्यालयात यायचे. मात्र मागील सत्रापासून शासनाने एक आदेश काढून महाविद्यालयांनाही प्रार्थना सक्तीची केली आहे. यासाठी शासनाने आपल्या स्तरावरून विद्यापिठांना प्रत्येक महाविद्यालयात प्रार्थना झाली पाहिजेत, असे निर्देश दिले. शासनाचे हे निर्देश मिळताच विद्यांपिठांनी महाविद्यालयांना सूचित करून नियमित प्रार्थना घेण्याचे निर्देश दिले आहेत. महाविद्यालयांना विद्यापिठाचे जेव्हापासून प्रार्थना घेण्याचे निर्देश देण्यात आले, तेव्हापासून महाविद्यालयातही प्रार्थनेचे स्वर गुंजू लागले आहेत. या प्रार्थनेत विद्यार्थ्यांसह महाविद्यालयातील प्राध्यापकवर्गही सहभागी होतात.शासनाने विद्यापीठास आणि विद्यापीठाने महाविद्यालयांना हा उपक्रम आवश्यक केला आहे. उपक्रम अतिशय सुंदर आहे. आमच्या महाविद्यालयात या आदेशाची अंमलबजावणी सुरू आहे.- डॉ. संजय सिंगप्राचार्य, गो.वा.महाविद्यालय नागभीड

टॅग्स :collegeमहाविद्यालय