उद्या लोकमत सखी मंचतर्फे ‘सेलेब्रिटी धमाका’

By Admin | Updated: February 5, 2016 00:52 IST2016-02-05T00:52:08+5:302016-02-05T00:52:08+5:30

लोकमत सखी मंच आणि आयएमए असोसिएशन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने खास लोकमत सखी मंच सभासदांकरिता ‘सेलीब्रिटी धमाका’ आयोजित करण्यात आला आहे.

Tomorrow 'celebrity blast' by Lokmat Sakhi platform | उद्या लोकमत सखी मंचतर्फे ‘सेलेब्रिटी धमाका’

उद्या लोकमत सखी मंचतर्फे ‘सेलेब्रिटी धमाका’

‘सर्कीट हाऊस’साठी सखींना तिकीट सवलतीच्या दरात : संजय नार्वेकर आणि भुषण कडू यांची विशेष उपस्थिती
चंद्रपूर : लोकमत सखी मंच आणि आयएमए असोसिएशन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने खास लोकमत सखी मंच सभासदांकरिता ‘सेलीब्रिटी धमाका’ आयोजित करण्यात आला आहे.
हा ६ फेब्रुवारी २०१६ ला स्थानिक आय.एम.ए. सभागृह सरदार पटेल कॉलेजजवळ सैनानी हॉस्पीटलच्या बाजुला, चंद्रपूर येथे दुपारी १ वाजता घेण्यात येणार आहे.
यावेळी ८ फेब्रुवारी २०१६ ला चंद्रपुरात सादर होणाऱ्या ‘सक्रीट हाऊस’ या धमाल विनोद नाटकातील सुप्रसिद्ध अभिनेते तसेच खबरदार, वास्तव (हिंदी चित्रपट) इंडियन, जबरदस्त, अग बाई अरेच्या, चश्मे बहाद्दर यासारख्या अनेक चित्रपटातून भूमिका बजावणारे संजय नार्वेकर तसेच कॉमेडी एक्सप्रेसच्या नावाने ओळखले जाणारे भूषण कडू यांच्या विशेष उपस्थितीत, तसेच नाटकातील महत्वपूर्ण भुमिकेतील अनिल कामत, प्रमोद कदम, राहुल कुलकर्णी, अंकुर वाढवे, हेमांगी वेलणकर, श्वेता घरत, मयुरा रानडे यांच्यासोबत सखी मंचाचा हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या ‘सेलेब्रिटी धमाका’ कार्यक्रमात सखी मंच सभासदांना नि:शुल्क प्रवेश राहणार आहे. तसेच इच्छुक सखी मंच सभासदांना नाटकाच्या प्रवेशिकाही सवलतीच्या दरात उपलब्ध होतील. अधिक माहितीसाठी लोकमत सखी मंच जिल्हा संयोजिका पूजा ठाकरे ९०११३२२६७४, भारती ठाकरे ९८५०५९६४६२ विठ्ठल मंदिर वार्ड, वंदना मुनघाटे ८८०६६२१०११, मालती कुचनवार ९६६५४९४०४०, मंजुषा भिमनवार ९८८१७२८६८७, अंजु चिकटे ९५७९४८७७४४, ज्योती पडिशालवार ९४२०४४६६५१, पुजा पडोळे ८८०५९८५५९२, प्रिती घाटे ९८२३४००१५७, स्नेहा धानोरकर ७६२०३०५९०३, किरण बल्की ९८६०९०११२४, सरिता मालू ९८५०४७१७०५, सुषमा नगराळे ९४२२१७५४६८, अर्चना मेहेरे ९४२२०१२२८८, पोर्णिमा डाहुले ७३८७५६११९१, रेखा महाजन ९५९५३४००६७, ज्योती दिनगलवार,, सोनाली धनमने ७२७६९७५५९, बिंदीया वैद्य, ज्योती एकोणकर, योगिता कुंटेवार, भानुमती बडवाइक, मंगला रूद्रपवार ९६८९६५३००८, रेखा बोबाटे ९७६६०१९८९५, मनिषा आंबेकर ९५७९१५०३९६, येथे संपर्क साधावा. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Tomorrow 'celebrity blast' by Lokmat Sakhi platform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.