टोमटा सिंचन योजनेला पंप चाचणीचे ग्रहण

By Admin | Updated: December 4, 2014 23:06 IST2014-12-04T23:06:42+5:302014-12-04T23:06:42+5:30

गोंडपिंपरी तालुक्यातील २०३४ हेक्टर शेतीला सिंचीत करणाऱ्या सोनापूर टोमटा योजनेचे बांधकाम पुर्ण झाले आहे. मात्र, योजनेसाठी उभारण्यात आलेल्या २२५ अश्वशक्तीच्या चार व्ही. टी. पंपाची यांत्रिकी व

Tomato irrigation scheme to pump test | टोमटा सिंचन योजनेला पंप चाचणीचे ग्रहण

टोमटा सिंचन योजनेला पंप चाचणीचे ग्रहण

मंगेश भांडेकर - चंद्रपूर
गोंडपिंपरी तालुक्यातील २०३४ हेक्टर शेतीला सिंचीत करणाऱ्या सोनापूर टोमटा योजनेचे बांधकाम पुर्ण झाले आहे. मात्र, योजनेसाठी उभारण्यात आलेल्या २२५ अश्वशक्तीच्या चार व्ही. टी. पंपाची यांत्रिकी व जलविद्युत विभागाने चाचणी न केल्याने ही योजना अद्यापही सुरु झालेली नाही.
गोंडपिंपरी तालुक्यातील टोमटा गावाजवळील वर्धा नदीच्या डाव्या तिरावर सोनापूर टोमटा उपसा सिंचन योजना आहे. या योजनेला २४ सप्टेंबर १९९१ ला मंजुरी मिळाली. योजनेसाठी ३६४.५० लक्ष रुपयांच्या प्रशासकीय मान्यतेलाही यावेळी मंजुरी देण्यात आली. या योजनेचा लाभ सोनापूर, टोमटा, वेडगाव, पोडसा, वेडगाव चक या पाच गावांना होणार आहे.
योजनेची सिंचन क्षमता २०३४ हेक्टर असून योजनेच्या मुख्य कामासाठी ६ हेक्टर व वितरणप्रणाली करीता गोंडपिंपरी तालुक्यातील ९७.८१ हेक्टर खाजगी जमीन संपादीत करण्यात आली आहे. रायझींग मेनकरीता ०.३२ हेक्टर जमीन भूसंपादनाचा नवीन प्रस्ताव १५ आॅगस्ट २०१३ ला उपविभागीय अधिकारी (राजस्व) मूल यांना सादर करण्यात आला आहे. योजनेला वनजमीनीची कोणतीही आवश्कता नसून पूनर्वसनाचीही अडचण नाही. तर ही योजना मध्यम सिंचन प्रकल्प असल्याने पर्यावरण मान्यतेचाही प्रश्न मिटला आहे. केंद्रीय जल आयोगाच्या मान्यतेची आवश्यकता नसतानाही या योजनेला १३ आॅक्टोबर २००३ ला केंद्रीय जल आयोगाने मान्यता प्रदान केली आहे.
या योजनेतून जून २०१४ पर्यंत २३१४ हेक्टरवर सिंचन क्षमता निर्मीत करण्यात आली आहे. तर टोमटा उप कालवा सा. क्र.५७० मी. वरील बॉक्स कर्ल्व्हटचे बांधकाम न झाल्यामुळे १२७ हेक्टरवर सिंचन क्षमता निर्मीत करण्यात अडचणी आल्या आहेत. या सर्व अडचणींवर मात होत नसल्याने सोनापूर टोमटा योजनेचे काम गेल्या २३ वर्षांपासून रखडले आहे.

Web Title: Tomato irrigation scheme to pump test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.