विदर्भ राज्याचे आज प्रतिकात्मक ध्वजारोहण

By Admin | Updated: May 1, 2016 00:30 IST2016-05-01T00:30:31+5:302016-05-01T00:30:31+5:30

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांनी आता आंदोलने आणखी तिव्र केली आहेत.

Today's symbolic flag hoisting of Vidarbha state | विदर्भ राज्याचे आज प्रतिकात्मक ध्वजारोहण

विदर्भ राज्याचे आज प्रतिकात्मक ध्वजारोहण

चंद्रपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांनी आता आंदोलने आणखी तिव्र केली आहेत. शासनाचे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी विदर्भवादी संघटनांकडून १ मे रोजी विविध ठिकाणी विदर्भ राज्याचे प्रतिकात्मक ध्वजारोहण करण्यात येणार आहे.
वेगळ्या विदर्भाच्या मागणीकरिता माजी महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे यांच्या नेतृत्त्वात संपूर्ण विदर्भात चळवळ उभी झाली आहे. येथील जनता महाविद्यालयाच्या पटांगणावर सकाळी ८.३० वाजता प्रतिकात्मक ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात विदर्भ राज्य आंदोलन समितीचीही तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत अनिल दिकोंडवार, जिल्हा अध्यक्ष किशोर पोतनवार, दिवाकर माणूसमारे, मितीन भागवत, किशोर दहेकर, वसंता चांदेकर आदी उपस्थित होते. या बैठकीत १ मे रोजी विदर्भाचा प्रतिकात्मक ध्वज फडकविण्याचा निर्णय घेण्यात आला. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Today's symbolic flag hoisting of Vidarbha state