आजचे विद्यार्थी उद्याचा भारत घडवतील- टेमुर्डे
By Admin | Updated: July 19, 2015 01:16 IST2015-07-19T01:16:15+5:302015-07-19T01:16:15+5:30
आजचे विद्यार्थी उद्याच्या भारताच्या विकासाचा पाया बनून आपल्या माता-पिता, आपले गाव, तसेच शाळेचे नाव उज्वल करतील किंबहुना उद्याचा भारतच ते घडवतील.

आजचे विद्यार्थी उद्याचा भारत घडवतील- टेमुर्डे
वरोरा : आजचे विद्यार्थी उद्याच्या भारताच्या विकासाचा पाया बनून आपल्या माता-पिता, आपले गाव, तसेच शाळेचे नाव उज्वल करतील किंबहुना उद्याचा भारतच ते घडवतील. भारतातच नव्हे तर विदेशातही आपला नावलौकीक वाढवतील, असे प्रतिपादन विधानसभेचे माजी उपाध्यक्ष अॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांनी केले.
स्थानिक पैगाम साहित्य सामाजिक विकास मंडळ वरोराच्या विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गरजू विद्यार्थ्यांना पाच हजार नोट बुक वितरणाचा कार्यक्रम हिरालाल लोया विद्यालयाच्या प्रांगणात गुरुवारी झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मोरेश्वर टेमुर्डे बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांचे महत्त्व विशद केले. यावेळी आर.एस. कैंट, बी.आर. शेगोकर, गोवर्धन पटेल, प्राचार्य ठेंंगणे यांची समायोचित भाषण झालीत. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पाच हजार नोटबुकाचे वितरण करण्यात आले. तसेच सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह, मानपत्र प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमाचे संचालन पिंपळे तर आभार श्रीरंग यांनी मानले. यशस्वीतेकरीता महेश वरारकर, अशोक धात्रक, विजय गोटे, अविनाश नेवास्कर, रामदास तिखट, विशाल वर्मा, अमित वर्मा, दिलीप उपरे यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)