जया द्वादशीवार यांच्या ललित लेखसंग्रहाचे आज प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 22:16 IST2019-03-16T22:15:51+5:302019-03-16T22:16:14+5:30
स्व. डॉ. जया द्वादशीवार यांच्या ‘चिंतन एका मनस्विनीचे’ या ललित लेखांच्या संग्रहाचे रविवारी १७ मार्चला सायंकाळी ५.३० वाजता प्रकाशन करण्यात येणार आहे.

जया द्वादशीवार यांच्या ललित लेखसंग्रहाचे आज प्रकाशन
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : स्व. डॉ. जया द्वादशीवार यांच्या ‘चिंतन एका मनस्विनीचे’ या ललित लेखांच्या संग्रहाचे रविवारी १७ मार्चला सायंकाळी ५.३० वाजता प्रकाशन करण्यात येणार आहे.
प्रा. सुरेश द्वादशीवार यांच्या निवासस्थानी होणाऱ्या या सोहळ्याला माजी गृहराज्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे, डॉ. मंदा आमटे, डॉ. विकास आमटे, डॉ. भारती आमटे, विनोद शिरसाट, आनंद लाटकर उपस्थित राहणार आहेत. मार्गदर्शक म्हणून डॉ. श्रीकांत तिडके व डॉ. प्रमोद मुनघाटे उपस्थित राहतील. यावेळी सेवाग्राममधील सुषमा शर्मा व आनंदवनचे ज्येष्ठ रुग्णसेवक डॉ. बाबा पोळ यांचा सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.