‘१० वी नंतर पुढे काय’ यावर आज मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 23:24 IST2018-03-28T23:24:56+5:302018-03-28T23:24:56+5:30
लोकमत बाल विकास मंच व चाणक्य कौन्सिलिंग सेंटरच्या वतीने ‘१० वी नंतर पुढे काय?’ या विषयावर शुक्रवारी दि. ३० सकाळी १०. ३० वाजता स्थानिक बसस्थानकाजवळील हॉटेल सिद्धार्थ प्रिमिअर येथे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

‘१० वी नंतर पुढे काय’ यावर आज मार्गदर्शन
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : लोकमत बाल विकास मंच व चाणक्य कौन्सिलिंग सेंटरच्या वतीने ‘१० वी नंतर पुढे काय?’ या विषयावर शुक्रवारी दि. ३० सकाळी १०. ३० वाजता स्थानिक बसस्थानकाजवळील हॉटेल सिद्धार्थ प्रिमिअर येथे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. प्रसिद्ध करियर कौन्सिलर व मोटीव्हेशनल स्पिकर अग्रवाल स्टडी सेंटर आणि चाणक्य कौन्सिलिंग सेंटरचे संचालक जगदिश अग्रवाल, नो युवर टॅलेंट अकादमीचे संचालक डॉ. रश्मी शुक्ला आदी मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमात वर्ग ९ ते १२ वीचे विद्यार्थी व पालक नि:शुल्क सहभागी होवू शकतात. सर्वप्रथम २०० विद्यार्थी पालक व सखी मंच सदस्यांना प्राधान्य देण्यात येईल. नुकतीच दहावीची परीक्षा झाली़ पुढे काय शिकावे,या विवंचनेत विद्यार्थी आहेत. दहावीनंतर विविध क्षेत्र त्यांना आकर्षित करत आहेत. भविष्याला कलाटणी देणारे हे वर्ष अतिशय महत्त्वाचे आहे. निर्णय घेताना विद्यार्थीच नव्हे तर पालकही गोंधळून जाण्याची शक्यता आहे. त्यातही डॉक्टर व अभियंता होण्यासाठी अभ्यासक्रम निवडणे, शिकवणी कोणती घ्यायची, महाविद्यालयाची निवड कशी करावी? आदी प्रश्न विद्यार्थी व पालकांना अस्वस्थ करीत आहेत. या प्रश्नांची उत्तरे या शिबिरात विद्यार्थी आणि पालकांना मिळणार आहेत. व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी आणि करियर संदर्भातील हे प्रशिक्षण पे्ररणादायी ठरणार आहे. भविष्याची वाटचाल समृद्ध करण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांनी हे प्रशिक्षण कदापि चुकवू नये, असा हा उपक्रम शहरात आयोजित करण्यात आला आहे़
यावेळी पालक व विद्यार्थ्यांना पडणाऱ्या विविध प्रश्नांची उत्तरे जगदिश अग्रवाल देणार आहेत. शिबिरामध्ये विद्यार्थी आणि पालकांना नि:शुल्क प्रवेश देण्यात येणार आहे. नोंदणी व अधिक माहितीसाठी उपक्रम प्रमुख अमोल कडूकर ९२७०१३१५८०, ७९७२६११२४३, सखी जिल्हा संयोजिका सोनम मडावी ९९७५६६६३५५ यांच्याशी संपर्क साधावा.
सर्व प्रश्नांची हमखास उत्तरे
शिक्षण क्षेत्रात प्रचंड स्पर्धा वाढल्याने विद्यार्थी मानसिकदृष्ट्या तणावात आहेत. करिअर कसे घडवावे, यासाठी विविध प्रश्नांनी त्यांचे मन अस्वस्थ झाले. या सर्व प्रश्नांची शास्त्रशुद्ध उत्तरे या कार्यक्रम विद्यार्थ्यांना मिळणार आहेत.