उमेदवारांच्या भाग्याचा आज फैसला
By Admin | Updated: April 18, 2016 00:58 IST2016-04-18T00:58:34+5:302016-04-18T00:58:34+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी रविवारी मतदान घेण्यात आले. चंद्रपूर, बल्लारपूर, चिचपल्ली व

उमेदवारांच्या भाग्याचा आज फैसला
चंद्रपूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी रविवारी मतदान घेण्यात आले. चंद्रपूर, बल्लारपूर, चिचपल्ली व पांढरकवडा या चारही मतदान केंद्रावर ९० टक्के मतदान झाल्याची माहिती कृऊबास प्रशासनाने दिली. उमेदवारांचे भाग्य मशीनबंद झाले असून सोमवारी निकाल घोषित होणार आहे.
या बाजार समितीवर आजवर काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे या निवडणुकीतही काँग्रेस विरूद्ध भाजप असा सामना रंगला. मतदान पार पडले असून आता उत्सुकता निकालाची लागून आहे. सोमवारी सकाळी जेष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात मतमोजणी होणार असून १२ वाजेपर्यंत निकाल स्पष्ठ होणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळात १८ उमेदवारांचा समावेश असून सेवा सहकारी संस्थेच्या गटातून एकूण १८ उमेदवार रिंगणात होते. तर ग्रामपंचायत गटातून सहा, व्यापारी-अडते मतदारसंघातून पाच उमेदवार रिंगणात होते. रविवारी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत सहकारी संस्था गटासाठी ३९७, ग्रामपंचायत गटासाठी ५४७, व्यापारी गटासाठी ३३९ तर हमाल-मापारी गटासाठी ६३ मतदारांनी मतदान केले. आता कोणत्या उमेदवाराचे भाग्य उजळणार व कोणत्या पक्षाचे संचालक मंडळ सत्तारूढ होणार, हे सोमवारी स्पष्ट होणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)