आज तुकूम विभागात विक्रमी भूमिपूजन
By Admin | Updated: September 4, 2016 00:50 IST2016-09-04T00:50:12+5:302016-09-04T00:50:12+5:30
राज्याचे वित्त व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या चंद्रपूर शहर विकास निधीतून तुकूम विभागातील ...

आज तुकूम विभागात विक्रमी भूमिपूजन
८२ रस्ते : पाच कोटी रुपयांचे क्राँक्रिटीकरण व डांबरीकरण
चंद्रपूर : राज्याचे वित्त व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या चंद्रपूर शहर विकास निधीतून तुकूम विभागातील प्रभाग क्र. १ मधील १ कोटी ८६ लाख रुपयांच्या ४७ रस्त्यांच्या सिमेंट क्राँक्रीटकरण व डांबरीकरण बांधकामाचा भूमिपूजन समारंभ व जाहीर सभेचे आयोजन ४ सप्टेंबर २०१६ रोजी करण्यात आले आहे. एकाच दिवशी ४७ रस्त्यांचे विक्रमी भूमिपूजन चंद्रपुरातील तुकूम प्रभाग १ मध्ये होणार असून तुकूम प्रभागाच्या विकासासाठी अथक परिश्रम करणारे भाजपचे नेते सुभाष कासनगोट्टूवार यांचे या परिसरातील नागरिकांनी स्वागत केले आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर शहराच्या विकासावर भर दिला असून त्याकरिता चंद्रपूर शहर विकास निधीअंतर्गत ४० कोटी रुपयांचे विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात नऊ कोटी रुपयांच्या कामांचा प्रारंभ ४ सप्टेंबर रोजी विविध ठिकाणी करण्यात येत आहे. नऊ कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्याच्या कामांमध्ये १.८६ कोटी रु. प्रभाग क्र. १ मध्ये ४ सप्टेंबर रोजी ४७ रस्त्याच्या बांधकामाचा प्रारंभ होत आहे. या कार्मक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ना. सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार असून अध्यक्ष म्हणून केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, आ. नाना श्यामकुळे, जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर वसंता देशमुख, सभापती देवराव भोंगळे यांची उपस्थिती राहणार आहे. या भूमिपूजनाच्या या कार्यक्रमानंतर सायंकाळी ५.३० वाजता निर्माण नगर ग्राऊंड, लॉ कॉलेज समोर, तुकूम येथे प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत जाहीर सभेत आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती राहावे, असे आवाहन सुभाष कासनगोट्टूवार, प्रमोद शास्त्रकार, माया मांदाडे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
चंद्रपूर शहर विकास निधी !
विकासातून चंद्रपूर शहराचा कायापालट करण्याच्या उद्देशाने पालकमंत्री मुनगंटीवार यांनी ४० कोटी रुपयांचा निधी चंद्रपूर शहराला प्राप्त करून असून या निधीतून मनपा हद्दीतील परिसराचा विकासावर भर दिला गेला आहे. त्यामधून तुकूम प्रभाग क्र. १ मध्ये एकाच वेळी ४७ रस्त्यांचे विक्रमी भूमिपूजन होणार आहे. यावेळी ३० कॉलनीमधील नागरिकांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. रस्त्याचे भूमिपूजन हे ११ ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार आवर्जून उपस्थित राहणार आहेत.