आज ‘सर्किट हाऊस’चा चंद्रपुरात प्रयोग

By Admin | Updated: February 8, 2016 01:13 IST2016-02-08T01:13:22+5:302016-02-08T01:13:22+5:30

लोकमत सखी मंच चंद्रपूर आणि आयएमए असोसिएशन चंद्रपूर तसेच श्री ज्ञानेश्वरी महाबहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त

Today 'Circuit House' Chandrapur experiment | आज ‘सर्किट हाऊस’चा चंद्रपुरात प्रयोग

आज ‘सर्किट हाऊस’चा चंद्रपुरात प्रयोग

चंद्रपूर : लोकमत सखी मंच चंद्रपूर आणि आयएमए असोसिएशन चंद्रपूर तसेच श्री ज्ञानेश्वरी महाबहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी ८ फेबु्रवारीला रात्री ९ वाजता स्थानिक प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह चंद्रपूर येथे ‘सर्किट हाऊस’ या धमाल विनोद नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.
या नाटकात प्रमुख भूमिकेत सिनेअभिनेते संजय नार्वेकर असुन खबरदार, जबरदस्त, अगं-बाई-अरेच्या, इंडियन, वास्तव यासारख्या हिंदी-मराठी सुपरहिट चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. विनोद कलाकार म्हणून ते परिचित आहेत. आज ‘सर्किट हाऊस’ या नाट्य प्रयोगाच्या माध्यमातून चंद्रपूरकरांना त्यांना प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच अभिनेते भुषण कडू यांचीही या नाटकात प्रमुख भुमिका असून चेहराफेरी, टार्गेट, माझी माणसे, श्यामची मम्मी आदी नाटक व सिनेमात त्यांनी अभिनय केला आहे.
या नाटकात अन्य कलावंतांमध्ये अनिल कामत, प्रमोद कदम, राहुल कुलकर्णी, अंकुर वाढवे, हेमांगी वेलनकर, श्वेता घरत, मयुरा रानडे यांचा समावेश आहे.
लोकमत सखी मंच आणि त्यांच्या परिवाराकरीता तिकीट शुल्कात विशेष सूट असुन जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी नाटकाचा आस्वाद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी लोकमत सखी मंच जिल्हा संयोजिका पूजा ठाकरे ९०११३२२६७४, ७२४९७३२७२१, बल्लारपूर तालुका संयोजिका-९२२६७४६२००, भद्रावती तालुका संयोजिका अल्का वाटकर- ८८८८४६३२४६, उज्वला खिरटकर वरोरा- ९४२१९२६४७४, बी.यू. बोर्डेवार राजुरा- ९९२२९०४१२५, हेमलता झटाले ऊर्जानगर- ९४२३४१८९२४, भारती ठाकरे ९८५०५९६४६२ विठ्ठल मंदिर वार्ड, वंदना मुनघाटे ८८०६६२१०११, मालती कुचनवार ९६६५४९४०४०, मंजुषा भिमनवार ९८८१७२८६८७, अंजु चिकटे ९८९०३०४५७३, ज्योती पडिशालवार ९४२०४४६६५१, पूजा पडोळे ८८०५९८५५९२, प्रिती घाटे ९८२३४००१५७, स्नेहा धानोरकर ७६२०३०५९०३, किरण बल्की ९८६०९०११२४, सरिता मालू ९८५०४७१७०५, सुषमा नगराळे ९४२२१७५४६८, अर्चना मेहेरे ९४२२०१२२८८, पौर्णिमा डाहुले ७३८७५६११९१, रेखा महाजन ९५९५३४००६७, ज्योती दिनगलवार,, सोनाली धनमने ७२७६९७५५९, बिंदिया वैद्य, ज्योती एकोणकर, योगिता कुंटेवार, भानुमती बडवाइक, मंगला रूद्रपवार ९६८९६५३००८, रेखा बोबाटे ९७६६०१९८९५, मनिषा आंबेकर ९५७९१५०३९६, यांच्याशी संपर्क साधावा. (शहर प्रतिनिधी)

नार्वेकर, कडू यांनी साधला सखींशी संवाद
८ फेब्रुवारीला चंद्रपुरात ‘सर्किट हाऊस’ या विनोद नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी स्थानिक आयएमए सभागृहात नाटकातील मुख्य कलावंत संजय नार्वेकर, भूषण कडू व अन्य सहकलावंतांनी संखीशी संवाद साधला. या कार्यक्रमाला इंडियन मेडिकल असोसिएशनचे चंद्रपूर अध्यक्ष डॉ.अशोक भुक्ते, सचिव डॉ.प्रसाद पोटदुखे, चंद्रपूर लोकमतचे शाखा व्यवस्थापक विनोद बुले, नगरसेवक संजय वैद्य प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी सखींनी विचारलेल्या प्रश्नांची संजय नार्वेकर व भूषण कडू यांनी दिलखुलास उत्तरे दिली. यावेळी सखी व नाट्यकलावंत यांच्या एक मिनिट स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन लोकमत सखी मंचच्या विदर्भ संयोजिका नेहा जोशी व चंद्रपूर जिल्हा संयोजिका पूजा ठाकरे यांनी केले.

Web Title: Today 'Circuit House' Chandrapur experiment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.