अंगणवाडी सेविकांचे मानधन थकीत
By Admin | Updated: February 2, 2015 23:03 IST2015-02-02T23:03:32+5:302015-02-02T23:03:32+5:30
अंगणवाडी महिलांचे मानधन प्रलंबित आहे. त्यामुळे जगण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शासनाच्या धोरणाचा फटका या महिलांना नेहमी बसत आहे. या धोरणाचा निषेध करण्यासाठी

अंगणवाडी सेविकांचे मानधन थकीत
चंद्रपूर : अंगणवाडी महिलांचे मानधन प्रलंबित आहे. त्यामुळे जगण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शासनाच्या धोरणाचा फटका या महिलांना नेहमी बसत आहे. या धोरणाचा निषेध करण्यासाठी अंगणवाडी महिलांनी सोमवारी जिल्हा परिषद समोर धरणे दिली. यावेळी शासनाच्या धोरणाचा धिक्कार केला.
शिष्टमंडळाने मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलिल यांना निवेदन दिले. अंगणवाडी महिलांना केंद्र तथा राज्य शासनाकडून मिळणारे मानधन चार महिन्यापासून मिळाले नाही. केंद्र सरकारने काळा पैसा शंभर दिवसात आणणार, प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये जमा करण्याचे पंतप्रधान मोदींनी आश्वासन दिले. मात्र काहीही झाले नाही. उलट अंगणवाडी सेविकांचे मानधन प्रलंबित ठेवून त्यांच्या जखमेवर मिठ चोळल्याचा आरोप प्रा. दहिवडे यांनी यावेळी केला. धरणे आंदोलनात शोभा बोगावार, वर्षा वाघमारे , पवित्रा ताकसांडे, गुजाबाई टोंगे, दुशिला उऱ्हाडे, माया कासट्टीवार, रत्नमाला वाघमारे, वैशाली बोकारे, लता झाडे, शोभा कालर्सेवार, सरस्वती धोटे आदी उपस्थित होत्या. (नगर प्रतिनिधी)