तिरथ उराडे कोरोना योध्दा म्हणून सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:43 IST2021-02-05T07:43:44+5:302021-02-05T07:43:44+5:30
मूल : महसूल विभाग तहसील कार्यालय, मूलच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कोरोना काळात उत्कृष्ट कार्य केलेले मूल येथील ...

तिरथ उराडे कोरोना योध्दा म्हणून सन्मानित
मूल : महसूल विभाग तहसील कार्यालय, मूलच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कोरोना काळात उत्कृष्ट कार्य केलेले मूल येथील डाॅ. तिरथ उराडे यांना कोरोना योध्दा म्हणून प्रशासकीय भवनात आयोजित केलेल्या मुख्य ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
सन २०१९-२० मध्ये कोविड १९ च्या जागतिक महामारीच्या काळात संपूर्ण देश एकजूट होऊन लढा देत असताना मूल येथील उपजिल्हा रुग्णालयातील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे (आरबीएसके) वैद्यकीय अधिकारी डाॅ. तिरथ उराडे यांनी दिवस-रात्री कोरोना रुग्णांची सेवा केली. त्यांनी केलेल्या परिश्रमामुळे तालुक्यात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास प्रशासनाला मदत झाली. यामुळे डाॅ. तिरथ उराडे यांचे तालुका प्रशासनाने कोरोना योध्दा म्हणून सन्मानित केले. यावेळी उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनुज तारे, तहसीलदार डाॅ. रवींद्र होळी, मूल नगरपालिकेचे उपाध्यक्ष नंदू रणदिवे, मूल पंचायत समितीचे सभापती चंदू मारगोनवार, तालुका कृषी अधिकारी प्रशांत कासराळे, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. सुमेध खोब्रागडे नायब तहसीलदार यशवंत पवार, पृथ्वीराज साधनकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन दिलीप गेडाम यांनी केले. कार्यक्रमाला तालुक्यातील अधिकारी वर्ग, शाळकरी मुले, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.