मेंहदी लावण्याच्या हातावर सॅनिटायझर चोळण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:29 IST2021-04-27T04:29:09+5:302021-04-27T04:29:09+5:30
साधारणत: दिवाळीपासूनच लग्नकार्याला सुरुवात होते. मार्च ते मे या महिन्यांत मोठ्या प्रमाणात लग्नसोहळे पार पडत असतात. मागील वर्षी कोरोनाचा ...

मेंहदी लावण्याच्या हातावर सॅनिटायझर चोळण्याची वेळ
साधारणत: दिवाळीपासूनच लग्नकार्याला सुरुवात होते. मार्च ते मे या महिन्यांत मोठ्या प्रमाणात लग्नसोहळे पार पडत असतात. मागील वर्षी कोरोनाचा शिरकाव झाला होता. परंतु, ५० लोकांची परवानगी असल्याने काही प्रमाणात लग्नसोहळे पार पडले. परंतु, सप्टेंबरमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली होती. सर्व सुरळीत सुरू झाले. त्यामुळे सहा महिन्यांपासून वधू-वर पित्यांनी विवाहाची तारीख निश्चित करून मंगल कार्यालय बुक केले होते. लग्नसराईची लगबग व धावपळही बऱ्याच प्रमाणात सुरू होती. मात्र, मार्च महिन्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढीस लागली. त्यामुळे शासनाने लॉकडाऊन व कडक निर्बंध लागू करण्यात आले. त्यामुळे वधू-वर पित्यांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे.
बॉक्स
आनंदावर विरजण
कोरोनामुळे घराच्या बाहेर निघण्यास बंदी आहे. त्यामुळे विवाहाच्या निमित्ताने अनेकांनी पत्रिका, कपड्याचे बस्ते व विविध प्रकारची तयारी केली होती. वधू-वरही आपापल्या परीने तयारीला लागले होते. अशातच लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे विवाहयोग्य युवक-युवतींच्या आनंदावर विरजण पडले आहे.
बॉक्स
व्यावसायिकांचे नुकसान
विवाह सोहळे रद्द झाल्याने कपडा, सोने, सौंदर्यप्रसाधने, मंगल कार्यालय, बँड, कैटरिंग, आचारी, बांगड्या, भांडी, फर्निचर यांच्यासह, आदी दुकानावर परिणाम पडला. त्यामुळे ऐन कमाईच्या सिझनमध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.