तोहोगावात मजुरांकरिता रोगनिदान शिबिर
By Admin | Updated: February 21, 2017 00:33 IST2017-02-21T00:33:35+5:302017-02-21T00:33:35+5:30
मध्यचांदा वनप्रकल्प विभाग बल्लारशाह व प्राथमिक आरोग्य केंद्र तोहगावच्या संयुक्त विद्यमाने तोहोगावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात मजुरांकरिता ...

तोहोगावात मजुरांकरिता रोगनिदान शिबिर
वनविकास महामंडळाचा उपक्रम : मजुरांना मोफत औषध वितरण
कोठारी : मध्यचांदा वनप्रकल्प विभाग बल्लारशाह व प्राथमिक आरोग्य केंद्र तोहगावच्या संयुक्त विद्यमाने तोहोगावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात मजुरांकरिता रोगनिदान शिबिर रविवारला घेण्यात आले. यामध्ये कन्हारगाव व तोहोगाव वनपरिक्षेत्रातील ७०० मजुरांनी लाभ घेतला.
वनविकास महामंडळाच्या चारही वनक्षेत्रात इमारतीची लाकडे, बीट, फाटे, बांबू तोडण्याचे कामे स्थानिक तथा परप्रांतिय मजुरांच्यामार्फंत सुरू आहे. जंगलात काम करणाऱ्या मजुरांना त्यांच्या मुलभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी वनविभागा कटीबद्ध आहे. त्यामुळे पिण्याचे स्वच्छ पाणी, पाणी गाळण्याच्या चाळण्या, मच्छरदाणी, मच्छर काईल, बॅकेट, निवासासाठी योग्य साहित्य पुरविण्यात येत आहे. तसेच मजुरांचे आरोग्य सुरळीत राहण्यासाठी सरकारी तथा खासगी दवाखाण्यातून मजुरांची तपासणी केली जात आहे. त्याच अनुषंगाने आरोग्य शिबीर तोहोगावात राबविण्यात आले. यावेळी मजुरांचे रक्त तपासणी करून त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. शिराळे यांनी मजुरांंना आरोग्याविषयी माहिती दिली. यावेळी मजुरांना फळे, बिस्कीट व जिवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.
यावेळी डॉ.जी.जे. शिराळे, आरोग्य सहायक एम.बी. गुरनुले, वनविकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक प्रफुल्ल वाघ, एस.वी. भडके, व्ही.झेड. भोयर, मोटघरे, बोरकर, मडावी, पाऊलझगडे, येल्लेवार, कारपेनवार, नारनवरे व दडमल आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहायक व्यवस्थापक बी.ए. कोपूलवार, कन्हारगाव वनाधिकारी पी.जी. निकोडे, तोहोगावचे आर.एफ.ओ. दासरवार, आत्राम, कोंडेवार, मलोडे, साबळे, कन्नाके आदी वनकर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. (वार्ताहर)