नागभीड तालुक्यात विहिरीत पडून वाघिणीचा मृत्यू

By राजेश भोजेकर | Updated: December 24, 2023 12:58 IST2023-12-24T12:58:59+5:302023-12-24T12:58:59+5:30

नागभीड तालुक्यातील गोविंदपूर येथे जंगलानजिक असलेल्या विहिरीत पडून वाघिणीचा मृत्यू झाला.ही वाघीन तीन वर्षाची आहे.

Tigress dies after falling into a well in Nagbhid taluka | नागभीड तालुक्यात विहिरीत पडून वाघिणीचा मृत्यू

नागभीड तालुक्यात विहिरीत पडून वाघिणीचा मृत्यू

चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील गोविंदपूर येथे जंगलानजिक असलेल्या विहिरीत पडून वाघिणीचा मृत्यू झाला.ही वाघीन तीन वर्षाची आहे. ही वाघीन शुक्रवारी रात्री विहिरीत पडली असावी असा अंदाज आहे.

सिंदेवाही तालुक्यात नुकताच विद्युत करंटने एका वाघाचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर वनविभागाने गस्त सुरू केली आहे. या गस्तीत जंगल भागातील विद्युत लाईन व विहिरींची तपासणी करणे सुरू आहे.या तपासणीचा एक भाग म्हणून रविवारी सकाळी गोविंदपूर बिटाचे वनरक्षक पी एम श्रीरामे हे तपासणी करीत असताना त्यांना विहिरीत एक वाघीण मृतावस्थेत आढळून आली.

लागलीच त्यांनी वरिष्ठांना माहिती दिली.माहिती मिळताच सहा. वनसंरक्षक संजय हजारे, तळोधीचे वनपरिक्षेत्र अधिकारी ए आर कन्नमवार आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले.

Web Title: Tigress dies after falling into a well in Nagbhid taluka