पांढरसराड येथे वाघाचा धुमाकूळ
By Admin | Updated: August 5, 2015 01:06 IST2015-08-05T01:06:53+5:302015-08-05T01:06:53+5:30
पेंढरी उपक्षेत्रात येणाऱ्या पांढरसराड येथे गेल्या काही महिन्यांपासून वाघाने धुमाकूळ घातला आहे.

पांढरसराड येथे वाघाचा धुमाकूळ
सावली : पेंढरी उपक्षेत्रात येणाऱ्या पांढरसराड येथे गेल्या काही महिन्यांपासून वाघाने धुमाकूळ घातला आहे. आजवर अनेक जनावरे वाघाने फस्त असून ऐन हंगामातच वाघाचा धुमाकूळ सुरू असल्याने शेतीची कामे ठप्प पडली आहेत.
दोन दिवसांपूर्वीच मारोती भीमा गेडाम या शेतकऱ्याचा बैल वाघाने ठार केला. गेडाम यांनी आपला बैल कळपात चरण्यासाठी सोडला होता. दुपारच्या सुमारास दबा धरुन बसलेल्या वाघाने हल्ला करुन बैल ठार केला. गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या वाघाने जनावरांना लक्ष्य केले आहे.
सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. वनकर्मचारीही निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने मौका पंचनाम्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. वाघाने सावली वनपरिक्षेत्रांतर्गत आतापर्यंत शेकडो बैल, गाई, शेळ्यांचा बळी घेतला. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. दरम्यान, या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)