सागवान तस्करीचा मेटॅडोर उलटला
By Admin | Updated: October 18, 2014 01:15 IST2014-10-18T01:15:11+5:302014-10-18T01:15:11+5:30
घनदाट जंगलातून सागवानाची कत्तल करून कोलांडी मार्गे सागवान तस्करी करणारा मेटॉडोर पलटी झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली.

सागवान तस्करीचा मेटॅडोर उलटला
जिवती : घनदाट जंगलातून सागवानाची कत्तल करून कोलांडी मार्गे सागवान तस्करी करणारा मेटॉडोर पलटी झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. वाहनात सागवान असल्याची माहिती वन विभागाला मिळताच घटनास्थळ गाठून मेटॉडोर व त्यातील लाखो रुपये किंमतीचे ५१ सागवान चौपट जप्त केले आहे.
मौलवान सागवानाची कत्तल करून तस्करी होत असल्याची माहिती पाटण वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. घटनेच्या दिवशी सापळाही रचला होता. मात्र, चुकीचा मार्ग सांगण्यात आले होते. सागवानाची चौपट भरून बिनधास्तपणे कोलांडीमार्गे नेत असताना घाटावर मेटॉडोर पलटला. त्यामुळे सागवान चोरीचे पितळ उघडे पडले.
घटनेची माहिती पाटण येथील वनक्षेत्र सहाय्यक पी.एच. भसारकर, वनरक्षक ए.डी. कऱ्हाडे, डी.एम. रामटेके, के.जी. देरकर व वनमजूर यांना मिळताच घटनास्थळ गाठले. घटनास्थळी असलेला एम.एच. ३१-एपी १९८२ या क्रमांकाच्या मेटॉडोरमध्ये सागवानाची ५१ चौपट आढळून आले. घटनेची माहिती वरिष्ठांना कळवून सागवान व मेटॉडोर जप्त करण्यात आला. घटना रात्रीची असल्याने सागवानाची तस्करी करणारा मुख्य सुत्रधार कोण, लाखो रुपयाचे सागवान चौपट कुणाचे, कुठे नेले जात होते, हे अद्याप गुपीत आहे. या आरोपींचा शोध घेण्याचे आवाहन वनविभागासमोर आहे. (तालुका प्रतिनिधी)