लोकमत न्यूज नेटवर्कगोंडपिपरी (चंद्रपूर) : गोंडपिपरी तालुक्यातील धाबा वनपरिक्षेत्रातील चेकपिपरी शेतशिवारात शनिवारी (दि. १८) वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाला. भाऊजी पत्रू पाल (७०) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
भाऊजी पाल हे शेतातील बैल आणण्यासाठी शनिवारी दुपारी ३ वाजता शेतात गेले. सायंकाळ होऊनदेखील भाऊजी बैल घेऊन घरी न परतल्याने त्यांच्या पत्नीने शेजाऱ्यांना माहिती दिली. शेजारी व गावकऱ्यांनी सायंकाळी शेतात जाऊन बघितले असता बैलजोडी शेतात बांधून होती. मात्र, भाऊजी पाल यांचा कुठेही पत्ता लागला नाही. अंधार असल्याने गावकऱ्यांनी बैल घरी आणले. सकाळी पुन्हा शोध घेतला असता, वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या भाऊजींचा मृतदेहच आढळला. त्यांच्या पश्चात पत्नी व मोठा आप्त परिवार आहे.
गावकऱ्यांनी त्वरित वन विभागाला कळवले. वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर गौरकार, क्षेत्र सहायक पुरी, बीटगार्ड दत्ता, निसर्ग सखा संस्थेचे अध्यक्ष दीपक वांढरे घटनास्थळी पोहोचले. अधिकाऱ्यांनी मृताच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपये रोख रक्कम देऊन मदत केली. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
Web Summary : In Gondpipri, a tiger killed a farmer, Bhauji Pal, in his field. When he didn't return, villagers searched and found his body. Forest officials provided immediate assistance. Fear prevails in the area.
Web Summary : गोंडपिपरी में एक बाघ ने किसान भाऊजी पाल को खेत में मार डाला। जब वे नहीं लौटे, तो ग्रामीणों ने खोजबीन की और उनका शव मिला। वन अधिकारियों ने तत्काल सहायता प्रदान की। इलाके में दहशत है।