चंद्रपूरमध्ये वाघाचा हल्ला, दोन गायी ठार
By साईनाथ कुचनकार | Updated: January 19, 2024 18:40 IST2024-01-19T18:39:07+5:302024-01-19T18:40:04+5:30
चिमूर वनपरिक्षेत्रातील शंकरपूर बिटातील मेटेपार जवळ मनोहर गडमडे यांचे शेत तसेच गोठा आहे.

चंद्रपूरमध्ये वाघाचा हल्ला, दोन गायी ठार
चंद्रपूर : शंकरपूर येथून जवळच असलेल्या मेटेपार येथील एका शेतकऱ्याच्या दोन गायी वाघाने ठार केल्या. ही घटना शुक्रवार दि.१९ जानेवारी रोजी पहाटे घडली.
चिमूर वनपरिक्षेत्रातील शंकरपूर बिटातील मेटेपार जवळ मनोहर गडमडे यांचे शेत तसेच गोठा आहे. नेहमीप्रमाणे गाय, बैलांना गोठ्यामध्ये बांधून ते घरी गेले. शुक्रवारी पहाटे वाघाने गायींवर हल्ला केला. यामध्ये त्यांच्या दोन गायी ठार झाल्या. यामध्ये संबंधित शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. वन विभागाला घटनेची माहिती मिळताच वनपाल व्ही. एस. पोरते, वनरक्षक कालिदास गायकवाड यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.