तळोधी वनपरिक्षेत्रात वाघाचे पुन्हा दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 23:48 IST2018-02-11T23:48:23+5:302018-02-11T23:48:39+5:30
ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत असलेल्या तळोधी (बा.) व सिंदेवाही वनपरिक्षेत्रात एका महिन्यात दोन पट्टेदार वाघाचा मृत्यू झाला असून पुन्हा या भागात पट्टेदार वाघाचे दिवसाढवळ्या दर्शन होत असल्याने नागरिक भयभीत झालेले आहे.

तळोधी वनपरिक्षेत्रात वाघाचे पुन्हा दर्शन
आॅनलाईन लोकमत
तळोधी(बा.): ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत असलेल्या तळोधी (बा.) व सिंदेवाही वनपरिक्षेत्रात एका महिन्यात दोन पट्टेदार वाघाचा मृत्यू झाला असून पुन्हा या भागात पट्टेदार वाघाचे दिवसाढवळ्या दर्शन होत असल्याने नागरिक भयभीत झालेले आहे.
ब्रह्मपुरी वनविभागातील एकूण १५९, ५८३२ चौ. मी. क्षेत्र घोडाझरी अभयारण्यात समाविष्ठ होत आहे. मात्र या भागात १० ते १५ वाघ, २३ बिबटे यासह रानगवा, चितळ, सांबर, निलगाय, कोल्हे, रानडुक्कर, माकड व ससे यासारखे वन्यजीव या भागात वास्तव्य करीत आहे.
निसर्गप्रेमी पर्यटक नेहमी या भागात भ्रमण करीत असतात. अनेक पर्यटक सकाळच्या वेळेस दुचाकीने या मार्गाने फिरतात. मात्र ब्रह्मपुरी वनविभागातील अनेक गावे जंगलाने वेढलेले आहे. तसेच या भागात अनेकांनी वनजमिनीवर अतिक्रमण केलेले असताना ब्रह्मपुरी वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी वर्गाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. वनाधिकारी जंगलात गस्त घालतात की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे.
जंगलाशेजारी असलेल्या गावातील लोकांना पुन्हा पट्टेदार वाघाचे दर्शन होत असल्यामुळे वनविभागाने त्यावर लक्ष देवून वाघाचा बंदोबस्त करावा, अशी जनतेची मागणी आहे.