मनपा निवडणुकीसाठी आंबेडकरी संघटनांची वज्रमूठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:20 IST2021-07-20T04:20:28+5:302021-07-20T04:20:28+5:30
चंद्रपूर : अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण हेमचंद्र खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली २०२२ च्या चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणूक ...

मनपा निवडणुकीसाठी आंबेडकरी संघटनांची वज्रमूठ
चंद्रपूर : अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण हेमचंद्र खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली २०२२ च्या चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणूक संदर्भात सोमवारी बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे भवन येथे सभा संपन्न झाली. ह्या सभेत समता सैनिक दल, भारतीय बौध्द महासभा, रिपब्लिकन पक्ष, बहुजन एम्प्लॉई फेडरेशन तसेच विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला होता.
यावेळी प्रवीण खोब्रागडे म्हणाले, प्रत्येक तळागळातल्या व्यक्तीपर्यंत पक्ष बळकट करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. तसेच आपापल्या विभागात पक्षाची शाखा बनवून निवडणुकीसाठी कटिबद्ध व्हावे, असे आवाहन केले. यावेळी पेट्रोल, गॅस वाढती महागाई, बेरोजगारी आदी संदर्भात पक्षाने आंदोलनाची भूमिका घ्यावी, याबाबतही चर्चा करण्यात आली. बैठकीला अशोक निमगडे, ॲड. सत्यविजय उराडे, अशोक टेंभरे, राजकुमार जवादे, विशाल अलोणे, शंकर वेल्हेकर, नागसेन वानखेडे, राजस खोब्रागडे, ॲड. अजित भडके, माणिक जुमडे, मृणाल कांबळे, लीना खोब्रागडे, अश्विनी खोब्रागडे, शालिनी भडके, दिलीप खाकसे, राहुल कांबळे आदी उपस्थित होते. संचालन सुरेश शंभरकर, प्रास्ताविक प्रेमदास बोरकर तर आभार महादेव कांबळे यांनी मानले.