शिक्षणातूनच कुणबी समाजाचा सर्वांगीण विकास शक्य
By Admin | Updated: January 25, 2015 23:11 IST2015-01-25T23:11:52+5:302015-01-25T23:11:52+5:30
समाज बांधवांनी आपल्या पारंपरिक व्यवसाय असलेल्या शेतीसोबत शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे. विविध क्षेत्रात पुढे जाण्यासाठी शिक्षण अत्यंत आवश्यक असून शिक्षणामधूनच

शिक्षणातूनच कुणबी समाजाचा सर्वांगीण विकास शक्य
चंद्रपूर : समाज बांधवांनी आपल्या पारंपरिक व्यवसाय असलेल्या शेतीसोबत शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे. विविध क्षेत्रात पुढे जाण्यासाठी शिक्षण अत्यंत आवश्यक असून शिक्षणामधूनच समाजाचा विकास होत असल्याचे मत राजुरा क्षेत्राचे माजी आमदार सुभाष धोटे यांनी येथे केले. खैरे कुणबी समाज स्नेह व सांस्कृतिक मंडळ, चंद्रपूरतर्फे स्थानिक मातोश्री सभागृह तुकूम येथे आयोजित वधू-वर परिचय मेळाव्याचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खैरे कुणबी समाजाचे जिल्हा अध्यक्ष डॉ. विजय देवतळे होते. विशेष अतिथी म्हणून कवी ज्ञानेश वाकुडकर, वर्धा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष कलावती वाकुलकर, भाजपाचे महासचिव खुशाल बोंडे, जि.प. चंद्रपूरच्या माजी सभापती आसावरी देवतळे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी विजय वाकुलकर, डॉ. बी.के. लोणारे, मनोज कळसकर, अमरावतीचे शाहुराव भोयर, नागपूरचे चंद्रकांत नवघरे, चौधरी, नथ्थू आरेकर, वृषाली धोटे, नितीन पिपरे, देवेंद्र बट्टे यांची उपस्थिती होती तर सत्कारमूर्ती म्हणून जि.प. चंद्रपूर महिला व बाल कल्याण सभापती सरिता कुडे, पोंभूर्णा समितीचे सभापती बापू चिंचोळकर, गोंडपिपरीचे पंचायत समितीचे उपसभापती रामचंद्र कुरवटकर, हरिशचंद्र पाल, समाजाचे सहसचिव दिनकर ठोंबरे यांची उपस्थिती होती.
यावेळी सरिता कुडे, बापू चिंचोलकर, रामचंद्र कुरवटकर, हरिचंद्र पाल, दिनकर ठोंबरे यांचा समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला. मेळाव्याला सहकार्य करणारे वृषाली धोटे, मनोज कळसकर, विलास कोळसे, संजय महाजन, किशोर डोमकावळे, सचिन करुटकर, विजय कळसकर, डॉ. राजू धानोरकर, गोपीनाथ भोयर, देवेंद्र बट्टे, प्रशांत फाले, आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी वधू-वरांचे माहिती असलेल्या ऋणानुबंध या स्मरणिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अहवाल वाचन समाजाचे सचिव जे.डी. पोटे यांनी केले. (प्रतिनिधी)