वेगवेगळ्या कारवाईत तीन वाहने जप्त

By Admin | Updated: November 9, 2016 02:01 IST2016-11-09T02:01:13+5:302016-11-09T02:01:13+5:30

मागील काही महिन्यांपासून तालुक्यात अवैध खनन व विना परवाना गौण खनिजाचीे वाहतूक सुरु आहे.

Three vehicles seized in different operations | वेगवेगळ्या कारवाईत तीन वाहने जप्त

वेगवेगळ्या कारवाईत तीन वाहने जप्त

अवैध खननप्रकरण : तहसीलदारांची कारवाई
वरोरा : मागील काही महिन्यांपासून तालुक्यात अवैध खनन व विना परवाना गौण खनिजाचीे वाहतूक सुरु आहे. त्या अनेक वाहनांवर तहसीलदार व त्यांच्या चमूने कारवाई केली. याच प्रकारच्या वेगवेगळ्या कारवाई मध्ये दोन ट्रक व एक जेसीपी मंगळवारी जप्त करण्यात आली .
तालुक्यातील मोहाळा शिवारात वाहन क्रमांक एम एच ४० एल २३५६ या जेसीपी दगडाचे अवैद्य खनन करीत असतांना आढळून आले. तसेच पांझुरणी येथील निलेश डोंगरवार यांच्या मालकीचे ट्रक क्र. एम एच ३४ एबी ०२९२ या मध्ये ३०० फूट बोल्डर विना परवाना वाहतूक करीत असतांना आढळून आले.तसेच चीनोरा आर पी सिंग यांच्या मालकीचा एम एच ३४ एम २७८४ या ट्रकने ३०० घन फूट गिट्टी विना परवाना वाहतूक करताना पकडण्यात आली. ही कारवाई तहसीलदार राजेश भांडारकर नायब तहसीलदार कोवे, मंडळ अधिकारी यांनी केली आहे. या कारवाईमुळे तस्करांचे धाबे दणाणले आहे. (शहर प्रतिनिधी )

Web Title: Three vehicles seized in different operations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.