रेती तस्करी करताना तीन ट्रॅक्टर पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:20 IST2021-07-20T04:20:31+5:302021-07-20T04:20:31+5:30
गोंडपिपरी तहसीलदारांची कार्यवाही गोंडपिपरी : रेतीची चोरी करण्यार्या उद्देशाने निघालेल्या ट्रॅक्टरचा पाठलाग करून तहसीलदारांनी तीन ट्रॅक्टर ताब्यात घेतले. ही ...

रेती तस्करी करताना तीन ट्रॅक्टर पकडले
गोंडपिपरी तहसीलदारांची कार्यवाही
गोंडपिपरी : रेतीची चोरी करण्यार्या उद्देशाने निघालेल्या ट्रॅक्टरचा पाठलाग करून तहसीलदारांनी तीन ट्रॅक्टर ताब्यात घेतले. ही कारवाही शनिवारी मध्यरात्री कुलथा परिसरात करण्यात आली. दोन महिन्यांपूर्वी गोंडपिपरी तहसीलदारांनी कार्यवाहीचा सपाटा सुरू केला. त्यानंतर रेती तस्कर धास्तावले होते. आता परत तस्करांनी डोकेवर काढले आहे.
तीन ट्रॅक्टर रेतीचोरीसाठी निघाल्याची माहिती गोंडपिपरीचे तहसीलदार के. डी. मेश्राम यांना मिळाली. त्यानंतर सहकाऱ्यांना घेऊन तहसीलदारांनी घाटावर जात ट्रॅक्टर ताब्यात घेतले. यामुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे.