अत्याचार प्रकरणात पुन्हा तिघे गजाआड

By Admin | Updated: November 13, 2014 22:59 IST2014-11-13T22:59:48+5:302014-11-13T22:59:48+5:30

येथील तुकूम परिसरातील एका युवकाला बेदम मारहाण करीत त्याच्या प्रेयसीवर अत्याचार केल्याप्रकरणी फरार असलेल्या तीन आरोपींना बुधवारी रामनगर पोलिसांनी नागपुरातून अटक केली.

Three torture cases again | अत्याचार प्रकरणात पुन्हा तिघे गजाआड

अत्याचार प्रकरणात पुन्हा तिघे गजाआड

नागपुरात लावला सापळा : १८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी
चंद्रपूर: येथील तुकूम परिसरातील एका युवकाला बेदम मारहाण करीत त्याच्या प्रेयसीवर अत्याचार केल्याप्रकरणी फरार असलेल्या तीन आरोपींना बुधवारी रामनगर पोलिसांनी नागपुरातून अटक केली. या आरोपींना १८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
शेख कदीर शेख जाकीर (३०) रा.तुकूम तलाव, वसीमखान अजिमखान (३१) रा.सरकारनगर, सिराजखान शहजान खान (३०) रा.हनुमाननगर अशी बुधवारी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी मकसूद शेख याला घटनेच्या दुसऱ्या दिवशी तर या प्रकरणातील एक अन्य अल्पवयीन आरोपीला दोन दिवसांपूर्वी अटक केली होती.
आरोपी शेख कदीर शेख जाकीर, वसीमखान अजिमखान, सिराजखान शहजान खान यांना गुरूवारी येथील जिल्हा न्यायालयात उभे केले असता, न्यायालयाने त्यांना १८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. घटनेनंतर हे आरोपी पोलिसांना गुंगारा देत होेते. मोबाईलवरून मिळणाऱ्या लोकेशनच्या माध्यमातून पोलिसांचे विशेष पथक त्यांच्या मागावर होते. मात्र प्रत्येकवेळी हे आरोपी पळून जाण्यात यशस्वी होत असत. मात्र बुधवारी नागपूर येथे तीनही आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन, चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजू भुजबळ, रामनगरचे ठाणेदार प्रल्हाद गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सुभाष बारसे, एएसआय सुरेंद्र तिवारी, पोलीस हवालदार सुनील बोरीकर, गजानन तुपकर, श्याम बारसागडे, दिवाकर रामटेके, विलास बलकी, नायक पोलीस शिपाई गजानन डोईफोडे, राकेश बंजारीवाले, पंकज शिंदे, किरण वाडीकर, प्रकाश निखाडे, नितीन दुधे, बंटी बेसरकर, रामकृष्ण सानप, प्रमोद कोटनाके यांनी पार पाडली. (प्रतिनिधी)

Web Title: Three torture cases again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.